Cameron Green Smashes Century At Wankhede Stadium : आयपीएल २०२३ चा ६९ वा सामना वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करून २० षटकात ५ विकेट्स गमावत २०० धावा कुटल्या होत्या. त्यानंतर विजयासाठी या धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सने हैदराबादच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. कर्णधार रोहित शर्मा आणि कॅमरून ग्रीनने मैदानात धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्माने ३७ चेंडूत ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. पण कॅमरून ग्रीनने धडाकेबाज फलंदाजी करत नाबाद शतक ठोकलं.

अवघ्या ४७ चेंडूत ८ षटकार आणि ८ चौकार ठोकून ग्रीनने वानखेडे मैदानात वादळी शतक ठोकलं. तसंच सूर्यकुमार यादवच्या २५ धावांच्या जोरावर मुंबईने २ विकेट गमावून १८ षटकात २९२ धावा करत या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. ग्रीनच्या या अप्रतिम फलंदाजीचा व्हिडीओ इंडियन प्रीमियर लीगच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

West Indies Beat England with New Record of Highest Successful Chase in in T20I At Home Soil of 219 Runs WI vs ENG
ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Australia Beat Pakistan by 29 Runs in 7 Over Game PAK vs AUS 1dt T20I Gabba Glenn Maxwell Fiery Inning
AUS vs PAK: ७ षटकांच्या सामन्यातही पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाच्या विजयात मॅक्सवेलची स्फोटक खेळी
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Axar Patel Stunning Catch of David Miller Reminds South Africa T20 World Cup 2024 Suryakumar Yadav IND vs SA 3rd T20I Watch Video
Axar Patel Catch: अक्षर पटेलने टिपला मिलरचा ‘सूर्या दादा स्पेशल कॅच’, सीमारेषेवर हवेत झेल घेत असा फिरवला सामना ; VIDEO व्हायरल
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?

नक्की वाचा – रविंद्र जडेजाच्या ‘त्या’ पोस्टमुळं क्रीडाविश्वात खळबळ, ट्वीटरवर म्हणाला, ” त्यांना कर्माचे फळ भोगावे लागेल…”

इथे पाहा व्हिडीओ

मुंबई इंडियन्ससाठी सलामीवीर फलंदाज ईशान किशन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. परंतु, ईशान १४ धावांवर असताना भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि कॅमरून ग्रीनने हैदराबादच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. रोहित अर्धशतकी खेळी करून मयंक डगरच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण त्यानंतर ग्रीनने धावांचा पाऊस पाडला अन् दमदार शतक ठोकलं. सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत २५ धावांची खेळी साकारली.

सनरायझर्स हैदराबादसाठी विव्रंत शर्माने ४७ चेंडूत २ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीनं ६९ धावांची खेळी केली. आकाश मधवालच्या गोलंदाजीवर शर्मा झेलबाद झाला. तसंच मयंक अग्रवालनेही अप्रतिम फलंदाजी करत ४६ चेंडूत ४ षटकार आणि ८ चौकार ठोकून ८३ धावांची खेळी केली. मयंकलाही आकाशने बाद केलं अन् पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर हेनरी क्लासेनही आकाशच्या गोलंदाजीवर १८ धावांवर असताना बाद झाला. हॅरी ब्रुकलाही आकाशने बाद करून हैदराबादला मोठा धक्का दिला.