CSK beats Gujarat to create record: चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा १५ धावांनी पराभव करत आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सीएसके संघाने आयपीएल २०२३ मध्ये यंदा चांगली कामगिरी केली आहे. आता सीएसकेच्या संघाने आयपीएलच्या इतिहासात असा पराक्रम केला आहे, जो आजपर्यंत कोणताही संघ करू शकलेला नाही. त्याबद्दल जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएसकेनी जीटीला पराभूत करत केली कमाल –

आयपीएल २०२३ मध्ये पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सविरुद्ध १७२ धावा केल्या. सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड (६० धावा) आणि डेव्हॉन कॉनवे (४० धावा) यांनी चमकदार कामगिरी केली. याशिवाय रवींद्र जडेजाने २२ धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच सीएसके संघ सन्मानजनक धावसंख्या उभारू शकला.

लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. वृद्धीमान साहा (१२ धावा), हार्दिक पांड्या (१२ धावा) आणि दासून शनाका (१७ धावा) यांना फार काही करता आले नाही. शुबमन गिलने ४२ आणि राशिद खानने ३० धावा केल्या. पण २० व्या षटकात शेवटच्या चेंडूवर संघ १५७ धावांवर ऑलआऊट झाला. गुजरात टायटन्सला ऑल आउट करणारा सीएसके हा आयपीएल मधील पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सला कोणीही ऑलआऊट करू शकले नव्हते.

हेही वााचा – IPL 2023: “एमआयला हरवायला मजा येईल, त्यांच्याशी आमचे जुने…”; चेन्नईच्या ‘या’ खेळाडूची मुंबईविरुद्ध फायनल खेळण्याची इच्छा

आयपीएल २०२३च्या विजेत्यापदाचा प्रबळ दावेदार –

सीएसके संघ २००८ पासून आयपीएलमध्ये भाग घेत आहे. या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४ हंगाम खेळले आहेत, ज्यामध्ये संघ १२ वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे आणि १० वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. महेंद्रसिंग धोनीने सीएसकेच्या नेतृत्वाखाली चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यावेळीही सीएसके संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.

हेही वाचा – CSK Team: चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू फायनल सामन्याला मुकणार

सीएसकेकडे धोनीसारखा कर्णधार आहे –

महेंद्रसिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. तो मैदानावर खूप शांत असतो आणि गोलंदाजीत खूप चांगले बदल करतो. अचूक डीआरएस घेण्यात तो उत्तम मास्टर आहे. फलंदाजीतही धोनीची गणना जगातील सर्वोत्तम फिनिशरमध्ये केली जाते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai super kings became the first team in ipl history to all out gujarat titans vbm