CSK CEO statement on MS Dhoni retirement : चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार की नाही हा मोठा प्रश्न कायम आहे. आयपीएल २०२४ संपल्यानंतर माहीचा आयपीएल प्रवासही संपेल आणि तो निवृत्त होईल, अशी अपेक्षा होती. अनेक दिग्गज खेळाडूही माही निवृत्त होणार असल्याची अटकळ बांधत होते. आता चेन्नई प्लेऑफमधून बाहेर पडल्याने चाहते धोनीच्या अपडेटची वाट पाहत आहेत की तो आयपीएल २०२५ मध्ये खेळताना दिसणार आहे की नाही. या एपिसोडमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या सीईओने धोनीबद्दल मोठी अपडेट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएसकेचे सीईओ धोनीबद्दल काय म्हणाले?

चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी धोनीबाबत माहिती दिली आहे. क्रिकबझशी बोलताना त्यांनी सांगितले की, “एमएस धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार की नाही याबाबत धोनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.” सीएसकेच्या सीईओला धोनीच्या पुढे खेळण्याबाबत विचारण्यात आले, त्यावर त्यांनी सांगितले की, “हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धोनीने पुढील हंगामात खेळणार की नाही याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.” अशा परिस्थितीत माही पुढच्या हंगामातही खेळताना दिसणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा माजी स्टार खेळाडू अंबाती रायुडू धोनीबद्दल म्हणाला की, “हरल्यानंतर धोनीने निवृत्त होणे चांगले दिसणार नाही. जर आयपीएल २०२४ मध्ये सीएसकेने ट्रॉफी जिंकली असती, तर माहीने निवृत्ती घेतली असती तर बरे झाले असते. आता सीएसकेचा संघ प्लेऑफ्समधून बाहेर पडला आहे, अशा परिस्थितीत माहीने सध्या आयपीएलमधून निवृत्ती घेऊ नये.” तसेच सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाने धोनीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – IPL 2024 : नऊ वर्षानंतर राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी Eliminator मध्ये आमनेसामने, पाहा आकडेवारी

धोनी पुढच्या हंगामातही खेळू शकतो- सुरेश रैना

एमएस धोनीने पुढचा हंगामही खेळावा आणि ट्रॉफी जिंकल्यानंतर आयपीएलला अलविदा म्हणावे, असे चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैनानेही धोनीच्या निवृत्तीबद्दल सांगितले की, तो अजूनही तंदुरुस्त आहे. पुढील हंगामातही तो संघासोबत खेळताना दिसणार आहे. त्याचवेळी, काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की धोनी पुढील हंगामात चेन्नईचा मार्गदर्शक म्हणून सामील होऊ शकतो. अशा परिस्थितीत माही काय निर्णय घेतो हे पाहणे बाकी आहे.

हेही वाचा – KKR संघाला दुहेरी फायदा, SRH विरुद्धचा सामना न खेळताही फायनलमध्ये पोहोचू शकतो, कसं ते जाणून घ्या?

माही काही महिने वाट पाहणार –

सीएसकेच्या एका सूत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “धोनीने सीएसकेमध्ये मध्ये कोणालाही सांगितले नाही की तो निवृत्त होणार आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी काही महिने वाट पाहणार असल्याचे त्यांनी व्यवस्थापनाला सांगितले आहे. तसेच आतापर्यंत विकेट्सच्या दरम्यान धावताना त्याला कोणतीही अस्वस्थता जाणवली नाही आणि हा एक प्लस पॉइंट आहे. त्यामुळे आम्ही धोनीच्या निर्णयाची प्रतीक्षा करू. तो नेहमी संघाचे हित लक्षात ठेवतो, त्यामुळे आता पुढे काय होते ते पाहूया.”

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai super kings ceo kasi vishwanathan big reveals whether ms dhoni will retire from ipl or not vbm