राजस्थान रॉयल्सविरोधात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीनं आक्रमक फलंदाजी करत १७ चेंडूत ३२ धावा कुटल्या. या इनिंगमध्ये धोनीने ३ षटकार आणि १ चौकार ठोकला. धोनीला शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्यात अपयश आलं, परंतु धोनीनं चाहत्यांच हृदय नक्कीच जिंकलं. राजस्थानने चेन्नईच्या संघाचा ३ धावांनी पराभव केला. त्यानंतर सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने चाहत्यांना धक्का दिला. धोनी दुखापतग्रस्त झाला असल्याचं फ्लेमिंगने माध्यमांशी बोलताना म्हटलं. त्यामुळं सीएसकेचे तमाम चाहते चिंताग्रस्त झाले आहेत. धोनीच्या दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली असल्याचं फ्लेमिंगने सांगितलं.

माध्यमांशी बोलताना फ्लेमिंग म्हणाला, “धोनी गुडघ्याच्या दुखापतीचा सामना करत आहे. धोनीचा फिटनेस नेहमीच जबरदस्त राहिला आहे आणि तो खूप प्रोफेशनलही आहे. त्याच्या दुखापतीच्या समस्येवर नजर ठेवली जात आहे. धोनी एक महान खेळाडू आहे. याबाबत आम्हाला कोणत्याच प्रकारची शंका नाहीय. धोनी सीएसकेचा पुढील होणारा सामना खेळणार की नाही, याबाबत फ्लेमिंगने सांगितलं नाही. परंतु, धोनीच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट चिंता वाढवणारी आहे.

Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
India A Beat India D In Duleep Trophy 2024 Pratham Singh Tilak Varma Score Century Shams Mulani Player of The Match
Duleep Trophy 2024: श्रेयस अय्यरच्या संघाचा दुलीप ट्रॉफीत सलग दुसरा पराभव, शम्स मुलानीच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर इंडिया ए विजयी
Mitchell Starc on Virat Kohli about IND vs AUS Test Series
‘मला त्याच्याविरुद्ध खेळताना…’, मिचेल स्टार्कचे विराटबरोबरच्या स्पर्धेबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘आमच्या दोघात…’
Duleep Trophy Ishan Kishan 7th first class century
इशान किशनचे झंझावाती शतकासह निवडसमितीला प्रत्युत्तर; दुलीप ट्रॉफी सामन्यात चौकार-षटकारांची लयलूट
AUS vs SCO Australia Team video viral with interesting Trophy
२६००० किमीचा प्रवास करुन ऑस्ट्रेलियाला मिळालं वाडगं; चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रियेने वेधलं लक्ष
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा

नक्की वाचा – CSK vs RR: …म्हणून शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकू शकलो नाही, एम एस धोनीनं सांगितलं त्यामागचं कारण

सीएसकेचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. काही खेळाडू दुखापतीमुळं डग आऊटमध्ये बसलेले आहेत, तर काही खेळाडू आयपीएलमधून बाहेर झाले आहेत. धोनीशिवाय दीपक चाहर, सिमरजीत, बेन स्टोक्स आणि सिसांडा मगालाही दुखापतग्रस्त झाला आहे. जॅमिसन आणि मुकेश चौधरी दुखापतीच्या कारणामुळं आयपीएल २०२३ मधून बाहेर पडले आहेत. दीपक चाहर दोन आठवड्यांसाठी टीममधून बाहेर आहे. तर सिसांडा मगालाही कमीत कमी एक आठवडा क्रिकेट खेळणार नाहीय. तसंच बेन स्टोक्सही ठीक होण्याची प्रतिक्षा करत आहे.