Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Match Update : आयपीएल २०२३ च्या १६ व्या हंगामात एकाहून एक रंगतदार सामने होत असून आज चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात लढत होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये महेंद्र सिंग धोनी आणि के एल राहुल आमनेसामने येणार आहेत. आयपीएल २०२३ च्या शुभारंभाच्या पहिल्याच सामन्यात चेन्नईला गुजरात टायटन्सविरोधात पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातने चेन्नईचा ५ गडी राखून पराभव केला होता. दुसरीकडे लखनऊच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात ५० धावांनी विजय मिळवला आहे.

त्यामुळे धोनीच्या सीएसकेला पहिल्या विजयाची प्रतिक्षा लागली असून लखनऊविरोधात त्यांच्या सामना अधिक रोमांचक होण्याची शक्यता आहे. चेन्नईचा घरेलू मैदानात दबदबा राहिला आहे. इथे खेळलेल्या जवळपास ७० टक्के सामन्यांमध्ये चेन्नईने विजय संपादन केलं आहे. या मैदानातील खेळपट्टीवर फिरकीपटूंचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे लखनऊला चेन्नईचा पराभव करण्यासाठी योग्य प्लेईंग ११ निवडावी लागेल. तर सीएसकेचा संघ घरेलू मैदानात मजबूत स्थितीत आणि परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या इराद्यात मैदानात उतरेल.

Harbhajan Singh believes India has a 50-50 chance of retaining the Border-Gavaskar Trophy in Australia
Harbhajan Singh : ‘जर सुरुवात चांगली झाली नाही तर…’, हरभजन सिंगचे पर्थ कसोटीपूर्वी मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘पहिलाच सामना खूप…’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shubman Gill ruled out of first Test match in Perth because of fractured thumb IND vs AUS Border Gavaskar Trophy
IND vs AUS: शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या कसोटीतून बाहेर, टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या, ‘हा’ खेळाडू करणार पदार्पण?
India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’

नक्की वाचा – IPL 2023: मैदानात ‘हेलिकॉप्टर शॉट’ची उत्तुंग भरारी; ‘या’ खेळाडूला टीम इंडियात घेण्याची मागणी, पाहा Video

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेईंग ११

चेन्नई सुपर किंग्ज त्यांच्या दुसऱ्या सामन्यात प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल न करता मैदानात उतरेल. पहिल्या सामन्यात धोनीने अंबाती रायडूच्या जागेवर तुषार देशपांडेला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवला होता. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी केली, तर तुषार देशपांडेच्या जागेवर सिमरनजीत सिंग इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळू शकतो. चेन्नईने प्रथम गोलंदाजी केल्यास, या दोन्ही खेळाडूंपैकी एक खेळाडू टीममध्ये असेल आणि इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात अंबाती रायडूची एन्ट्री होईल.

CSK प्रथम फलंदाजीसाठी प्लेईंग ११ : ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉन्वे, बेन स्टोक्स, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार विकेटकीपर), मिचेल सेंटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगरगेकर

CSK प्रथम गोलंदाजीसाठी प्लेईंग ११ : ऋतुराज गायकवाड, डेवोन कॉन्वे, बेन स्टोक्स, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार विकेटकीपर), मिचेल सेंटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगरगेकर, सिमरनजीत सिंग/तुषार देशपांडे

लखनऊ सुपर जायंट्सची संभाव्य प्लेईंग ११

लखनऊ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५० धावांनी दारुण पराभव केला होता. त्यामुळे चेन्नई विरोधात होणाऱ्या सामन्यात लखनऊ प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल करण्याची शक्यता कमी आहे. लखनऊच्या टीमने प्रथम फलंदाजी केली, तर आयुष बदोनीचा समावेश केला जाईल. लखनऊने प्रथम गोलंदाजी केल्यास कृष्णप्पा गौतमला संधी दिली जाईल. या दोन्ही खेळाडूंपैकी एक खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर बनेल.

लखनऊ प्रथम फलंदाजीसाठी प्लेईंग ११ : केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), केली मेयर्स, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, आवेश खान, रवि बिश्नोई, अमित मिश्रा , मार्क वुड

लखनऊ प्रथम गोलंदाजीसाठी प्लेईंग ११ : के एल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), केली मेयर्स, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, के गौतम, आवेश खानन, रवि बिश्नोई,अमित मिश्रा, मार्क वुड