Chennai Super Kings vs Mumbai Indians Match Updates : चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या गोलंदाजांनी भेदक मारा केल्यामुळं मुंबईला २० षटकात ८ विकेट्स गमावत १३९ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. डेवॉन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाडने धडाकेबाज फलंदाजी केली. शिवम दुबेने चौफेर फटकेबाजी करून चेन्नईला विजयाच्या दिशेनं नेलं. त्यामुळे चेन्नईने १७.४ षटकात ४ विकेट्स गमावत १४० धावा करून सामना खिशात घातला आणि मुंबईचा पराभव झाला.
चेन्नईसाठी ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत ३० धावा दिल्या. डेवॉन कॉनव्हेनंही धडाकेबाज फलंदाजी करून ४२ धावांची खेळी साकारली. अजिंक्य रहाणेनं २१ धावा करून चेन्नईच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवला. तर शिवम दुबे २६ धावांवर नाबाद राहिला. धोनीनं एक धाव घेऊन चेन्नईला विजय मिळवून दिला.प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची चेन्नईच्या गोलंदाजांनी दाणादाण उडवली.
पॉवर प्ले मध्ये तीन फलंदाज बाद करून चेन्नईने मुंबईला मोठा धक्का दिला. सलामीसाठी कॅमरून ग्रीन आणि ईशान किशन मैदानात उरतले होते. परंतु, दोघंही स्वस्तात माघारी परतले. चेन्नई सुपर किंग्जे वेगवान गोलंदाज दिपक चहर आणि तुषार देशपांडेनं पॉवर प्ले मध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना बाद केलं. दिपकने कर्णधार रोहित शर्माला शून्यावर झेलबाद केलं. तसंच सलामीवीर फलंदाज कॅमरून ग्रीनला ६ धावांवर क्लीन बोल्ड केलं.
तिसऱ्या षटकात दिपक चहरच्या गोलंदाजीवर ईशान किशन ७ धावांवर बाद झाला.दिपक चहरच्या भेदक माऱ्यापुढं कर्णधार रोहित शर्मा शून्य धावा करून बाद झाला. परंतु, नेहल वढेराने सावध खेळी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आणि दमदार अर्धशतक ठोकलं. वधेराने ५१ चेंडूत ६४ धावा केल्या. पाथिराना आणि तुशार देशपांडेच्या भेदक माऱ्यापुढं मुंबई इंडियन्सने २० षटकात ८ विकेट्स गमावत १३९ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे चेन्नईला विजयासाठी १४० धावांंचं आव्हान देण्यात आलं होतं.