चेन्नईने ठेवलेले १८७ धावांचे आव्हान किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुरुवारी पेलू शकला नाही आणि घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किग्ज पुन्हा एकदा अपराजित राहिला. पंजाबचा संघ २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावाचं काढू शकला आणि या सामन्यात चेन्नईने १५ धावांनी विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱया चेन्नईच्या सुरैश रैनाने ५३ चेंडूत सात चौकार आणि सहा षटकारांच्या साह्याने शतक पूर्ण केले. त्याला मायकल हसीने ३५ धावा काढून चांगली साथ दिली. रैनाच्या शतकाच्या जोरावर चेन्नईने पंजाबपुढे विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले.
पंजाबच्या शॉन मार्श आणि डेव्हिड मिलर यांनी आश्वासक खेळी केली. मार्शने ७३ तर मिलरने ५१ धावा काढल्या. मात्र, या दोघांच्या खेळीनंतरही विजय साकारण्यात पंजाबला अपयश आले. ब्राव्होने पंजाबचे तीन गडी टिपले.
घरच्या मैदानावर चेन्नईचं पुन्हा ‘किंग’
चेन्नईने ठेवलेले १८७ धावांचे आव्हान किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ गुरुवारी पेलू शकला नाही आणि घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किग्ज पुन्हा एकदा अपराजित राहिला.
First published on: 02-05-2013 at 07:41 IST
मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai won by 15 runs against kings eleven punjab