आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अनुभवी लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलने २०१३च्या ‘आयपीएल’दरम्यान मद्यप्राशन केलेल्या संघ-सहकाऱ्याकडून गैरवर्तनाच्या धक्कादायक अनुभवाचा गौप्यस्फोट केला आहे. यंदा राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणारा चहल त्या वेळी मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. ‘‘२०१३मध्ये मी मुंबई इंडियन्सकडून खेळत होतो आणि आमचा बंगळूरु येथे सामना झाला. त्या सामन्यानंतर आम्ही सर्व खेळाडू आणि संघातील अन्य सदस्य एकत्रित जमलो. त्यात एका खेळाडूने खूप मद्यप्राशन केले. मी त्याचे नाव सांगू इच्छित नाही. त्याने मला सर्व खेळाडूंपासून वेगळे नेले आणि खिडकीच्या बाल्कनीबाहेर लटकवले. आम्ही १५व्या मजल्यावर होतो. मी त्याला घट्ट धरून ठेवले. त्यानंतर इतर लोक तेथे आले आणि त्यामुळे मी बचावलो,’’ असे चहल म्हणाला.

‘‘माझी शुद्ध हरपली होती. मग तेथे आलेल्या लोकांनी मला पाणी दिले. त्या वेळी मला एक गोष्ट कळली की, तुम्ही कुठेही असलात तरी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. माझे प्राण थोडक्यात बचावले होते,’’ असेही चहलने नमूद केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colleague drunken team mate experience 2013 ipl leaked ysh