आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २७ वा सामना चांगलाच रोमांचकारी ठरला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा दिग्गज फलंदाज दिनेश कार्तिकने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची पिसं काढली. दिनेश कार्तिकने षटकार आणि चौकार लगावत मैदानात धावांचा पाऊस पाडला. दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून समालोचक हर्षा भोगले यांनी दिनेश पार मरिन ड्राइव्ह आणि राजभवनापर्यंत षटकार मारतोय, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.

हेही वाचा >> IPL 2022, MI vs LSG : सचिनच्या बाजुला बसला अर्जुन तेंडुलकर, सामन्यातील गुरु-शिष्याचे फोटो व्हायरल

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २७ व्या सामन्यात रॉयल चॅलेजर्ज बंगळुरु आणि दिल्ली कॅपिट्लस यांच्यात लढत झाली. सुरुवातीला फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरुने धडाकेबाज फलंदाजी करत दिल्लीसमोर १८९ धावांचा डोंगर उभा केला. ही धावसंख्या उभारताना दिनेश कार्तिकने धावांचा पाऊस पाडला. त्याने ३४ चेंडूंमध्ये पाच चौकार आणि पाच षटकार लगावत एकूण ६६ धावा केल्या.

हेही वाचा >> IPL 2022, MI vs LSG : लखनऊचा ‘सुपर’ विजय, मुंबईच्या पदरी सलग सहावा पराभव

त्याच्या चौफेर फटकेबाजीमुळे पूर्ण प्रेक्षक गॅलरीत दिनेश कार्तिकचा जयजयकार केला जात होता. विशेष म्हणजे समालोचन करत असलेले हर्षा भोगलेदेखील प्रभावित झाले. त्यांनी दिनेश कार्तिक मरिन ड्राईव्ह तसेच राजभवानापर्यंत षटकार मारतोय, असं म्हणत त्याची स्तुती केली.

हेही वाचा >> IPL 2022: सलग सहाव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स Playoffs आधीच स्पर्धेतून बाहेर?; पाहा Qualification चं गणित काय सांगतंय

दरम्यान, दिनेश कार्तिकने या हंगामात पहिल्यापासून धडाकेबाज फलंदाजी केली आहे. संघ अडचणीत असताना दिनेशने एकट्याने संघाला विजय मिळवून दिलेला आहे. आजच्या सामन्यातही दिनेशने नाबाद ६६ धावा करुन बंगळुरुला १८९ धावांपर्यंत नेऊन ठेवले.

Story img Loader