एकामागून एक विजय मिळवत राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे विजयाची हॅट्ट्रिक साजरी केल्यानंतर सनरायझर्स हैदराबादबरोबर त्यांचा चौथा सामना होणार आहे. या वेळी विजयात सातत्य राखण्यावर त्यांचा भर असेल. दुसरीकडे हैदराबादच्या संघाने गेल्या सामन्यात विजय मिळवला होता, त्यामुळे या सामन्यात राजस्थानसारख्या बलाढय़ समजल्या जाणाऱ्या संघाला ते धक्का देण्यासाठी प्रयत्नशील असतील.
गेल्या सामन्यात बंगळुरूला पराभूत केल्यानंतर हैदराबादच्या संघाचा आत्मविश्वास दुणावला असेल. गेल्या सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी दिली होती. त्यामुळे त्यांच्याकडून कामगिरीत सातत्य राखण्याची जबबादारी असेल. गोलंदाजांची चांगली फळी हैदराबादकडे आहे. डेल स्टेन आणि भुवनेश्वर कुमार यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा नक्कीच असतील.
शेन वॉटसनच्या अनुपस्थितीमध्ये स्टीव्हन स्मिथ समर्थपणे संघाचे नेतृत्व करताना दिसत आहे, त्याचबरोबर फलंदाजीमध्येही तो दमदार कामगिरी करत आहे. अजिंक्य रहाणेसारखा खंदा फलंदाज त्यांच्याकडे असून तोदेखील लौकिकाला साजेशी कामगिरी करत आहे. संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असून ही संघाची जमेची बाजू आहे. धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे हे दोन्ही मुंबईकर अचूक गोलंदाजी करत आहेत.

प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स- शेन वॉटसन (कर्णधार), अंकित शर्मा, ब्रेनडर स्रान, रजत भाटिया, स्टुअर्ट बिन्नी, बेन कटिंग, जेम्स फॉकनर, दीपक हुडा, धवल कुलकर्णी, विक्रमजीत मलिक, ख्रिस मॉरिस, करुण नायर, अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, प्रदीप साहू, दिनेश साळुंखे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, टिम साऊदी, प्रवीण तांबे, राहुल टेवाटिया, रस्टी थेरॉन, सागर त्रिवेदी, दिशांत याग्निक.
सनरायझर्स हैदराबाद- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), शिखर धवन, आशीष रेड्डी, रिकी भुई, रवी बोपारा, इऑन मॉर्गन, ट्रेंट बोल्ट, मॉइझेस हेन्रिके, सिद्धार्थ कौल, भुवनेश्वर कुमार, प्रवीण कुमार, चामा मिलिंद, नमन ओझा, परवेझ रसूल, केव्हिन पीटरसन, पद्मनाभन प्रशांत, लोकेश राहुल, इशांत शर्मा, करण शर्मा, लक्ष्मीरतन शुक्ला, डेल स्टेन, हनुमा विहारी, केन विल्यमसन.

Story img Loader