कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी नुकतेच प्रवीण तांबे यांच्या बायोपिकचे स्पेशल स्क्रिनिंग पाहिले. स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी तांबे खूपच भावूक झाले. चित्रपट संपल्यानंतर ते भाषणादरम्यान रडू लागले. याचा व्हिडीओ केकेआरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केकेआरने हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ या व्हिडीओत चित्रपट संपल्यानंतर प्रवीण जेव्हा काही बोलायला उठले तेव्हा ते भावूक झाले आणि काही बोलूच शकले नाही. थोड्यावेळात ते एक संदेश देत म्हणाले, “स्वप्न पाहा, कारण स्वप्न एकदिवस नक्कीच पूर्ण होतात.”

आणखी वाचा : “हे लज्जास्पद आहे”, काश्मिरी पंडितांवर बोलताना प्रीती गांधींचा शरद पवारांवर हल्लाबोल

आणखी वाचा : धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स, ४० लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला हा Viral Video

त्यानंतर इतर खेळाडू प्रवीण यांच्या चित्रपटाविषयी आणि त्यांच्या विषयी बोलताना दिसतात. केआरकेचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, आम्ही बऱ्याच दिवसांपासून या स्क्रिनिंगची वाट पाहत होतो. हा एक अप्रतिम चित्रपट आहे. गाणी चांगली आहेत आणि शेवटी चित्रपटाने आम्हाला खूप भावूक केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “…असले घाण आरोप कोणी लावू नका”, विशाखा सुभेदारने घेतला ‘हास्य जत्रा’ सोडण्याचा निर्णय

प्रवीण यांनी २०१३ मध्ये वयाच्या ४१व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ५० वर्षीय प्रवीण यांनी त्यांच्या संघर्षादरम्यान एकाच वेळी त्यांचे काम आणि क्रिकेटमध्ये समतोल साधला, पण त्यांना कोणत्याही देशांतर्गत संघात स्थान मिळणे कठीण होते. तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांचा संघर्ष आणि मेहनतीचे फळ त्यांना मिळाले आणि २०१३ त्या आयपीएल सुरु होण्याआधी राजस्थान रॉयल्सच्या नजरेत ते आले.

आणखी वाचा : Live Chat दरम्यान पतीच्या कर्करोगाविषयी बोलताना अभिज्ञा भावे झाली भावूक, म्हणाली…

यानंतर प्रवीण यांनी २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर गुजरात लायन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सकडूनही खेळू लागले. त्यानंतर तांबे केकेआरच्या सपोर्ट स्टाफमध्ये रुजू झाले. प्रवीण तांबे हे केआरकेचे फिरकी गोलंदाजीचे सल्लागार आहेत.