Stephen Fleming Gives Warning To Ashish Nehra : आयपीएल २०२३ च्या फायनल सामन्याबाबत विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. दोन्ही संघांकडून खूप काही बोललं जात आहे. गुजरात टायटन्सचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट विक्रम सोलंकी यांनी गुजरात टायटन्स फायनलसाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगने मोठं विधान केलं आहे. फ्लेमिंगने गुजरात टायटन्सचे प्रशिक्षक आशिष नेहराला मोठा इशारा दिला आहे. आम्ही त्यांच्या आदर खूप करतो, पण त्यांना सलग दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकून देणार नाहीत, अशी प्रतिक्रिया फ्लेमिंगनं दिली आहे.
आयपीएलच्या फायनलआधी फ्लेमिंगने पत्रकार परिषदेत गुजरात टायटन्सला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होऊ देणार नाही यावर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, मला वाटतं हे शक्य नाही. त्यांच्यासाठी सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणं खूप कठीण असेल. गुजरात एक चांगला संघ आहे आणि त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. मला त्यांचा कोचिंग स्टाफ खूप आवडतो. ते खूप बॅलेंस्ड लोक लोक आहेत. आशिष नेहराला खेळाबद्दल खूप ज्ञान आहे. मी चेन्नईत त्यांच्यासोबत काम केलं आहे. नेहराचा उत्साह खूप जबरदस्त असतो. त्यांनी आतापर्यंत जे काही कमावलं आहे, त्याचा आम्ही खूप आदर करतो पण सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणं खूप कठीण आहे.
आयपीएल २०२३ चा फायनल सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि डिफेंडिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केल्याने फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता त्यांच्या लक्ष पाचव्या जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्याकडे असणार आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करून फायनलमध्ये जागा पक्की केली. गुजरात सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्न करेल. दोन्ही संघ या हंगामातील सर्वात बेस्ट संघ आहेत. अशातच हा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.