IPL 2025 CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने त्यांच्या खराब कामगिरीसह आरसीबीविरूद्धचा यंदाच्या आयपीएलमधील सामना जिंकला. आरसीबीने संपूर्ण सामन्यात चेन्नई संघावर दबाव कायम ठेवला आणि अखेरीस १७ वर्षांनंतर चेपॉकच्या मैदानावर ५० धावांनी मोठा विजय मिळवला. चेन्नईचा माजी कर्णधार धोनीही संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. चेन्नईने १०० धावांच्या आत ७ विकेट्स गमावले होते. पण तरीही धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला तोपर्यंत सामना हातातून निसटला होता.
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने चेन्नई सुपर किंग्जच्या कोचिंग स्टाफवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. तिवारी म्हणाला की, धोनीला फलंदाजीच्या क्रमाने खेळण्यास सांगण्याची हिंमत कोचिंग स्टाफमध्ये नाहीये. चेन्नईला घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. १९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धोन९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला.या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
क्रिकबझशी बोलताना तिवारीने चेन्नईच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आणि म्हणालe की, ते मोठे निर्णय घेण्यास घाबरतात. धोनीला सामन्यात फलंदाजीला पाठवण्याची हिंमत त्याच्यांत नाहीये. तिवारी यांनी कोचिंग स्टाफच्या वृत्तीवर प्रश्न उपस्थित केला.
तिवारी म्हणाला, “१६ चेंडूत ३० धावा करणारा धोनीसारखा फलंदाज फलंदाजीला का आला नाही हे माझ्या समजण्यापलीकडचं आहे. तुम्ही फक्त जिंकण्यासाठी खेळता ना, बरोबर?” पुढे सीएसकेच्या कोचिंग स्टाफवर ताशेरे ओढत मनोज म्हणाला, “धोनीने एकदा ठरवल्यानंतर त्याला सामन्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची सीएसकेच्या कोचिंग स्टाफमध्ये हिंमतच नाहीय. हेच सत्य आहे.”
पॉवरप्लेमध्ये संघाने तीन विकेट गमावल्यामुळे चेन्नई सुपर किंग्जची टॉप ऑर्डर फ्लॉप झाली. टॉप ऑर्डरमधील एकाही फलंदाजांने लयीत आणि सावध फलंदाजी केली नाही आणि जिंकण्यासाठीचा नेट रन रेट सातत्याने वाढत गेला. धोनीच्या आधी रवींद्र जडेजा आणि आर अश्विन फलंदाजीसाठी क्रीजवर पोहोचले. हा निर्णय पाहून चेन्नईच्या चाहत्यांनाही धक्का बसला.
धोनीने या सामन्यात मोठे शॉट्स खेळले आणि १६ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह ३० धावा केल्या. यादरम्यान त्याने कृणाल पांड्याच्या चेंडूवर दोन षटकार ठोकले. हे सामन्याचे अंतिम षटक होतं आणि तोपर्यंत खूप उशीर झाला होता. चेन्नई संघाने २० षटकांत ८ विकेट गमावून केवळ १४६ धावा केल्या आणि आरसीबीने ५० धावांनी सामना जिंकला.