Deepak Chahar said he would like to play final against Mumbai: आयपीएल २०२३ मधील पहिला क्वालिफायर सामना मंगळवारी गुजरात आणि चेन्नई संघात खेळला गेला. या सामन्यात सीएसकेने जीटी १५ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीतील एका जागेसाठी तीन संघांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामध्ये लखनौ सुपर जायंट्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या नावांचा समावेश आहे. त्तपुर्वी सीएसकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरने एक मोठे वक्तव्य केले आहे.
२६ मे रोजी फायनमध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचे नाव निश्चित होईल, परंतु त्याआधी सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने त्याच्या आवडत्या संघाचे नाव सांगितले आहे. ज्याच्याविरुद्ध त्याला अंतिम फेरीत खेळायचे आहे.
अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायला आवडेल –
गुजरातविरुद्धच्या विजयानंतर जिओ सिनेमाशी बोलताना दीपक चहरने सांगितले की, त्याला अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायला आवडेल. दीपक चहर म्हणाले, “एमआयला हरवायला मजा येईल, जर एमआय आले तर… त्यांच्याशी आमचे जुने नाते आहे. जर ते आले तर हा सामना खूप मनोरंजक असेल. दीपक चहरला मध्येच थांबवताना सुरेश रैनाने त्याला विचारले की, चेन्नईचा सर्वाधिक वेळा मुंबईकडून फायनल पराभव झाला आहे, तेव्हा दीपकने उत्तर दिले की, तेच बदलायचे आहे.
हेही वाचा – CSK Team: चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू फायनल सामन्याला मुकणार
सीएसकेने मुंबईविरुद्ध केवळ एकदाच फायनल जिंकली आहे –
चेन्नई सुपर किंग्जचा संघ १०व्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी सीएसकेने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ वेळा आणि एकूण ९ वेळा फायनल खेळली आहे. त्या ४ सामन्यांमध्ये मुंबईने तीन वेळा तर चेन्नईने फक्त एकदाच विजय मिळवला आहे. सीएसके ने २०१० च्या फायनलमध्ये फक्त एकदाच मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर मुंबईने २०१३, २०१५ आणि २०१९ मध्ये चेन्नईला फायनलमध्ये पराभूत केले आहे. मुंबई इंडियन्स या वर्षीही अंतिम फेरी गाठण्याचा प्रबळ दावेदार आहे.
हेही वाचा – CSK Team: चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू फायनल सामन्याला मुकणार
दीपक चहरचे शानदार कमबॅक –
चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चहर आयपीएल २०२३ च्या फायनलपूर्वी जबरदस्त लयीत परतला आहे. दुखापतीमुळे गेल्या मोसमात खेळू न शकलेला दीपक चहर या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्येही प्रभावी दिसत नव्हता. दीपकला पहिल्या ४ सामन्यात एकही विकेट मिळाली नव्हती, मात्र दीपकने शेवटच्या 5 सामन्यात १२ बळी घेतले आहेत. यादरम्यान दीपकने पॉवरप्लेमध्ये चांगल्या विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याने इशान किशन, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, फिलिप सॉल्ट, व्यंकटेश अय्यर, जेसन रॉय, रिले रोसो आणि शुबमन गिल या खेळाडूंना बाद केले आहे.