IPL 2025 Chennai Super Kings Full Squad and Schedule: आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या चेन्नई सुपर संघातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आयपीएल २०२५ च्या महालिलावात जुना सहकारी रवीचंद्रन अश्विनला सीएसकेने ताफ्यात सामील केलं आहे. आयपीएलच्या सुरुवातीला अश्विन चेन्नई सुपर किंग्जचाच भाग होता. चाळिशीकडे झुकलेल्या अश्विनसाठी चेन्नईने ९.७५ कोटींची बोली लावली. आता जडेजा-अश्विनही फिरकी जोडी सीएसकेच्या ताफ्यात पुन्हा एकत्र दिसेल. संपूर्ण संघ कसा आहे? जाणून घेऊया.

चेन्नईने त्यांचा भरवशाचा यष्टीरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉन्वेला संघात समाविष्ट केलं. रचीन रवींद्रसाठी त्यांनी राईट टू मॅचचा अधिकार वापरला. स्फोटक खेळींसाठी प्रसिद्ध राहुल त्रिपाठीलाही त्यांनी संघात घेतलं. तब्बल १० कोटी रुपये खर्चून चेन्नईने अफगाणिस्तानचा युवा डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमदला ताफ्यात घेतलं आहे. चेन्नईने खलील अहमद या उंचपुऱ्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजावरही विश्वास ठेवला आहे. मूळच्या तामिळनाडूच्याच विजय शंकरला चेन्नईने घेतलं आहे.

चेन्नई सुपर किंग्जने पाच खेळाडूंना रिटेन केलं. ज्यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, शिवम दुबे आणि एमएस धोनी यांचा समावेश आहे. चेन्नईने रवींद्र जडेजाला १८ कोटी रुपये दिले आहेत. ऋतुराज गायकवाडलाही १८ कोटींना कायम ठेवण्यात आले आहे. मथिशा पाथिरानाला १३ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. शिवम दुबेला १२ कोटी आणि धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून ४ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे संघाकडे लिलावात उतरण्यापूर्वी ५५ कोटी रुपये शिल्लक होते.

याशिवाय पंजाब किंग्सचे कर्णधारपद भूषवलेल्या उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सॅम करनही आता चेन्नईच्या ताफ्यात असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नॅथन एलिस आणि इंग्लंडचा जेमी ओव्हरटन हे खेळाडूही सीएसकेच्या संघात आहेत. तर भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील एकापेक्षा एक उत्कृष्ट खेळाडू कमलेस नागरकोटी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, गुर्जपनीत सिंग यांनाही सीएसकेने संघात घेतलं आहे. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अंशुल कंबोज, मुकेश चौधरी यांच्याकडे असेल.

सीएसकेच्या ताफ्यातील रिटेन केलेले खेळाडू आणि किंमती

रवींद्र जडेजा – १८ कोटी
ऋतुराज गायकवाड – १८ कोटी
मथिशा पथिराना – १३ कोटी
शिवम दुबे – १२ कोटी
एम एस धोनी ४ कोटी

चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल २०२५ साठी संपूर्ण संघ (Chennai Super Kings IPL 2025 Full Squad)

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), एमएस धोनी, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, सय्यद खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, गुर्जपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद

चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२५ चे वेळापत्रक (IPL 2025 Chennai Super Kings Match Schedule)

२३ मार्च – चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स<br>२८ मार्च – चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
३० मार्च – राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स
५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स
८ एप्रिल – पंजाब किंग्स वि. चेन्नई सुपर किंग्स
११ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स
१४ एप्रिल – लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स
२० एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स
२५ एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद
३० एप्रिल – चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स
३ मे – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स
७ मे – कोलकाता नाईट रायडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स
१२ मे – चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स
१८ मे – गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स

Story img Loader