कठीण काळातून जात असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघातील दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोईन अली जखमी झाला आहे. पंजाब किंग्जसोबतच्या सामन्याआधी सराव करताना त्याच्या घोट्याला इजा झाली आहे.

हेही वाचा >>मुंबईच्या प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या, ट्विट करत रोहित शर्माने चाहत्यांना दिला खास संदेश, म्हणाला…

चेन्नई सुपर किंग्जचे दीपक चहर, अॅडम मिल्ने, डेवॉन कॉन्वे असे दिग्गज खेळाडू आधीच संघाबाहेर आहेत. त्यात आता मोईन अलीदेखील जखमी झाला आहे. आजच्या पंजाब किंग्जसोबतच्या सामन्याआधी सराव कराताना त्याच्या घोट्याला मार लागला आहे. त्याच्यावर सध्या उपचार करण्यात येत आहेत. मात्र घोट्याला मार लागल्यामुळे मोईन अलीला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. पुढचे तीन ते चार सामने तो संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >> IPL 2022 : मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय ? रोहित शर्माने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला…

याआधी व्हिसा न मिळाल्यामुळे मोईन अली सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. तसेच या हंगामात मोईन अलीने खास कामगिरी केलेली नाही. पाच सामन्यांमध्ये त्याने फक्त ८७ धावा केलेल्या आहेत. तसेच तो आतपर्यंत एकही बळी घेऊ शकलेला नाही. त्याच्या या खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सविरोधातील सामन्यात त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नव्हता.

Story img Loader