बुधवारी (दि. १० मे) चेन्नईच्या चेपॉक म्हणजेच एम. ए. चिदंबरम स्टेडिअमवरील आयपीएल २०२३चा ५५वा सामना चेन्नई सुपर किंग्स संघासाठी खास ठरला. महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वातील सीएसकेने या सामन्यात दिल्लीला २७ धावांनी पराभवाचा धक्का दिला. हा सामना जिंकताच चेन्नईने गुणतालिकेतील स्थान आणखी बळकट केले. चेन्नईच्या या प्रवासात अष्टपैलू शिवम दुबे याचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. आपल्या आक्रमक फटकेबाजीने त्याने संपूर्ण हंगाम गाजवल्याचे दिसून येते. पण चेन्नईकडून सर्वाधिक धावा करणारा डेव्हॉन कॉनवे या सामन्यात फ्लॉप ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तिसऱ्या अंपायरचा खराब निर्णय

अक्षर पटेलने डेव्हॉन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कॉनवे १३ चेंडूत १० धावा करून बाद झाला. डेव्हॉन कॉनवेला रिव्ह्यू घेण्याची संधी आहे. मात्र ऋतुराज गायकवाड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. आयपीएलचा हा मोसम डेव्हॉन कॉनवेसाठी वाईट ठरला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमारच्या जागी ललित यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या ललित यादवने डेव्हॉन कॉनवेला पायचीत केल्यानंतर जोरदार अपील केले. अंपायरने नकार दिल्यावर दिल्लीने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये बॅटचा कोणताही भाग चेंडूला लागलेला दिसला नाही. अल्ट्राएजमध्ये कुठलाही स्पाइक नसताना चेन्नईच्या बाजूने अंपायरने निर्णय दिला.

अक्षरने बाद करण्यापूर्वी कॉनवेसाठी आणखी एकदा (LBW) पायचीतची अपील झाली आणि दिल्लीने यावेळी DRS घेतला. पण, चेंडू व बॅटचा स्पर्श झाल्याचे सांगून तिसऱ्या अंपायरने कॉनवेला नाबाद ठरवले. मात्र, रिप्ले नीट पाहिल्यास चेंडू बॅटपासून दूर असल्याचे स्पष्ट दिसत होते आणि त्यावरून युसुफ पठाणने नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “अंपायर आज त्याचा चष्मा घालायला विसरलाय वाटतं.” अंपायरच्या या निर्णयानंतर चाहते सोशल मीडियावर सतत प्रश्न उपस्थित करत आहेत.

शिवम दुबे आयपीएल२०२३ मध्ये चमकला

शिवम दुबे हा मागील हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे. आक्रमक फटकेबाजी तसेच मध्यमगती गोलंदाजासाठी ओळखला जाणारा दुबे यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व राजस्थान रॉयल्स या संघासाठी खेळला होता. मात्र, त्यावेळी त्याला एखाद दोन सामन्या व्यतिरिक्त फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. मात्र, चेन्नईसाठी तो सातत्यपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे.

हेही वाचा: IPL2023: एम.एस. धोनी म्हणजे कोण? दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंनी माहीचे एका शब्दात केले वर्णन, पाहा Video

आयपीएल २०२३मध्ये त्याने फिरकीपटूंविरुद्ध सर्वाधिक १६ षटकार मारले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर १४ षटकारांसह संजू सॅमसन येतो. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल याने १३ षटकार फिरकीपटूंविरुद्ध खेचले आहेत. दुबे या हंगामात सरासरी १८.५ चेंडू खेळून बाद झाला आहे. त्याचवेळी त्याने प्रत्येक ११ चेंडूंनंतर ‌ षटकार खेचलेला आकडेवारीनुसार दिसून येते. याचाच अर्थ त्याने प्रत्येक सामन्यात एक तरी षटकार खेचला आहे. दुबे याच्या आयपीएल २०२३ मधील कामगिरीचा विचार केल्यास त्याने ११ सामन्यात तीन अर्धशतकांच्या मदतीने ३१५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ३५ तर स्ट्राईक रेट १५९ इतका प्रभावी राहिला आहे. यामध्ये तब्बल २७ षटकारांचा समावेश असून, सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk vs dc former player yusuf pathan angry over poor umpiring was their foul play with delhi avw