CSK vs GT IPL 2023 Final: आज आयपीएलच्या १६ व्या हंगामातील महाअंतिम सोहळा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडणार आहे. यंदाच्या आयपीएल मधील रेकॉर्ड्स पाहिल्यास चेन्नई सुपर किंग्सने ८ पैकी ८ सामने जिंकले होते आणि पॉईंट टेबलमध्ये ते दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांनी क्वालिफायर 1 मध्ये गतविजेत्याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर, दुसरीकडे, गुजरात टायटन्सने स्पर्धेच्या साखळी टप्प्यात त्यांच्या १४ पैकी १० सामने जिंकले आणि पॉईंट टेबल मध्ये ते अव्वल स्थानावर राहिले होते. आजच्या सामन्यासाठी प्रचंड उत्सुकता असताना पावसाचा अडथळा आल्यास नक्की काय होणार याची सविस्तर माहिती जाणून घेऊया…

CSK vs GT मध्ये पाऊस पडल्यास राखीव दिवस आहे का? (Is There Reserve Day For IPL 2023 Final)

आयपीएलच्या २०२२ च्या अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवण्यात आला होता. पण बीसीसीआयने शेअर केलेल्या शेड्युलनुसार २०२३ मध्ये असा कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही. जर आजच्या सामन्यामध्ये पाऊस पडलाच तर आजचा दिवस रद्द करून उद्या पूर्णपणे नव्याने सामना घ्यायचा की नाही हा निर्णय बीसीसीआयचा असेल. याशिवाय आयपीएलच्या आजच्या सामन्यात विलंब झाल्यास अगोदरच दोन तासांचा म्हणजेच १२० मिनिटांचा अतिरिक्त वेळ राखून ठेवण्यात आला आहे. म्हणजेच समजा आज मॅच ७.३० च्या वेळेपेक्षा अर्धा तास उशिराने सुरु झाली तरी साधारण १२ ते १२.३० पर्यंतचा वेळ पुढे वाढवला जाऊ शकतो.

ajit pawar
उद्या मंत्रिमंडळ विस्तार? अजित पवार यांचा दावा; दोन दिवसांच्या चर्चेत सूत्र निश्चित
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
water cut in Thane on Friday Water supply will be provided in phases for two days
ठाण्यात शुक्रवारी पाणी नाही; काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

CSK vs GT मध्ये पाऊस पडल्यास विजेता कसा निवडणार? (Weather In Ahmedabad During CSK vs GT)

२८ मे रोजी अहमदाबादमधील हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. अक्यूवेदरनुसार, तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पण स्थानिकांकडून वातावरणाचा अंदाज घेतल्यास कालपासून ढगाळ आकाश दिसून येत आहे. त्यामुळे काही अंशी पावसाची शक्यता आहे.अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता कमी असली आणि हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे एकही चेंडू टाकला गेला नाही, तर गुणतालिकेत सर्वोच्च स्थान असलेला एक खेळाडू ट्रॉफी जिंकेल. या प्रकरणात, गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्जच्या पुढे असल्याने यंदा सुद्धा आपले विजेतेपद टिकवून ठेवतील

किंवा सामना सुरु झाला आणि सामन्याच्या वेळी पाऊस आलाच तर निश्चितपणे विजेते निश्चित करण्यासाठी डकवर्थ-लुईस (DLS) पद्धत लागू होईल. यासाठीही दोन्ही संघाना किमान पाच षटके खेळण्याची संधी मिळणे हा निकष पाळला जाईल.

हे ही वाचा << CSK vs GT मध्ये धोनी व हार्दिक पांड्याची ‘प्लेइंग ११’ कशी असणार? ऋतुराज, शुबमनची जागा पक्की पण…

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सचा महामुकाबला आपल्याला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कसह जिओ सिनेमावर सुद्धा पाहता येईल. तसेच क्षणोक्षणीचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ताच्या होम पेजवर सुद्धा आपण भेट देऊ शकता.

Story img Loader