TATA IPL 2023 Final, CSK vs GT Date Time Venue: आयपीएल टी-२० क्रिकेटच्या १६व्या हंगामाचा महाअंतिम सामना आज रविवारी खेळवला जाणार आहे. गतविजेत्यांना आपले जेतेपद टिकवून ठेवण्यासाठी आणि धोनीला एका सीझनच्या ब्रेकनंतर पुन्हा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी आजचा सामना निर्णायक ठरेल. चेन्नई व गुजरात यांच्यापैकी कोणाचे स्वप्न पूर्ण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील या अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकही तितकेच उत्सुक आहेत. काही दिवसांपूर्वी याच सामन्याच्या तिकीट बुकिंगवरून चेंगराचेंगरी व वाद झाल्याचे व्हिडीओ सुद्धा समोर आले होते. आपण मात्र घरातून आरामात हा सामना बघणार असाल तर नेमके कधी, कुठे सर्वात लवकर अपडेट मिळवता येतील हे आपण पाहणार आहोत. तसेच गुजरात विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात पावसाची किती शक्यता आहे? खेळपट्टीचा स्थिती कशी आहे? अंतिम सामन्याची प्लेइंग ११ टीम कशी असेल? याही प्रश्नांची उत्तरे पाहूया…
CSK vs GT सामना तारीख व वेळ: २८ मे २०२३ संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटे
CSK vs GT स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
CSK vs GT मॅच कुठे पाहाल?
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्सचा महामुकाबला आपल्याला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कसह जिओ सिनेमावर सुद्धा पाहता येईल. तसेच क्षणोक्षणीचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसत्ताच्या होम पेजवर सुद्धा आपण भेट देऊ शकता.
CSK vs GT पीच रिपोर्ट (CSK vs GT Final Pitch Report)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमचा ट्रॅक फलंदाजांसाठी अतिशय उत्तम ठरू शकतो आहे. हा एक सपाट ट्रॅक आहे ज्यात सम प्रमाणात बाऊन्स आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना विकेट मिळू शकतात परंतु एकूणच, फलंदाजांना मध्यभागी चांगला वेळ मिळेल. बाउंड्री लहान आहेत आणि आउटफिल्ड वेगवान आहे. अशा स्थितीत पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १८० पर्यंत सहज जाऊ शकते असा अंदाज आहे. तर आजवर या मैदानात धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने येथे मोठे विक्रम आहेत. या मैदानात पार पडलेल्या सामन्यांमध्ये दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 60 टक्के विजयी ठरला आहे.
CSK vs GT मध्ये पाऊस पडणार का? (Weather In Ahmedabad During CSK vs GT)
२८ मे रोजी अहमदाबादमधील हवामान क्रिकेटसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. अक्यूवेदरनुसार, तापमान ३५ ते ४० अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आयपीएल फायनलच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता नाही.
CSK vs GT IPL २०२३ रेकॉर्ड्स
दरम्यान, आजवरचे रेकॉर्ड्स पाहिल्यास चेन्नई सुपर किंग्सने ८ पैकी ८ सामने जिंकले होते आणि पॉईंट टेबलमध्ये ते दुसऱ्या स्थानावर राहिले. त्यांनी क्वालिफायर 1 मध्ये गतविजेत्याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर, दुसरीकडे, गुजरात टायटन्सने स्पर्धेच्या साखळी टप्प्यात त्यांच्या १४ पैकी १० सामने जिंकले आणि पॉईंट टेबल मध्ये ते अव्वल स्थानावर राहिले. त्यांनी क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. या दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एकूण ४ सामने खेळले आहेत, ज्यात गुजरात टायटन्सने ३ तर चेन्नई सुपर किंग्जने एक सामना जिंकला आहे.