आयपीएल क्रिकेटचा १५ वा हंगाम आजपासून सुरु होतोय. या हंगामातील पहिल्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ एकमेकांना भिडतील. आयपीएलच्या या रणसंग्रामात पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करणार आहेत. आजचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रात्री ७.३० वाजता सुरु होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महेंद्रसिंह धोनीच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष

आयपीएल क्रिकेट सुरु होण्याच्या दोन दिवस अगोदर महेंद्रसिंह धोनीने कर्णधारपद सोडले. त्यानंतर आता चेन्नईचे नेतृत्व रविंद्र जाडेजाकडे आले आहे. दरम्यान धोनी चेन्नई संघात कायम असून तो यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून आपले योगदान देणार आहे. यापूर्वी धोनीकडे कर्णधारपद असल्यामुळे पूर्ण संघाची जबाबदारी त्याच्याकडे होती. मात्र आता त्याचे रविंद्र जाडेजाला मार्गदर्शन असले तरी तो मुक्तपणे खेळू शकणार आहे. दबाव नसल्यामुळे आता धोनीच्या फलंदाजीमध्ये सुधार दिसेल अशी आशा आहे. चांगल्या धावा करण्याची धोनीकडे नामी संधी आहे.

नवखा रविंद्र जाडेजा संघाला विजय मिळवून देणार ?

धोनीनंतर चेन्नईचे कर्णधारपद आता रविंद्र जाडेजाकडे आले आहे. त्याने यापूर्वी क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारामध्ये कर्णधारपद भूषवलेले नाही. मात्र चेन्नईच्या संघाची पूर्ण जाबाबदारी खांद्यावर असल्यामुळे रविंद्र जाडेजा कशी कामगिरी करणार पाहणे आज महत्त्वाचे ठरणार आहे. जाडेजाला धोनीचे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे मार्गदर्शन असेल. पहिल्याच सामन्यात विजय मिळाला तर जाडेजा आणि संघाचे मनोबल वाढेल. त्यामुळे जाडेजा संघाला विजय मिळवून देण्यासाठी काय करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

अष्टपैलू खेळाडू चेन्नईसाठी जमेची बाजू

चेन्नई संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. रविंद्र जाडेजा, मोईन अली, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो असे अष्टपैलू खेळाडू संघात असल्यामुळे चेन्नईला मोठी धावसंख्या करण्याची संधी आहे. तसेच दीपक चहर, ब्राव्हो, अॅडम मिल्ने असे गोलंदाज असल्यामुळे विरोधी संघाला रोखून धरणे चेन्नईला सोपे जाणार आहे.

केकेआरकडे खेळाडूंची मोठी फौज

दुसरीकडे केकेआरकडेही खेळाडूंची मोठी फौज आहे. श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना मोठी कामगिरी केली होती. दिल्लीला फायनलमध्ये घेऊन जाण्याचे काम अय्यरने केले होते. त्यामुळे अय्यर मोठा अनुभवी खेळाडू असून त्याचा फायदा केकेआरला होऊ शकतो. मात्र केकेआरकडे असलेले फिरकीपटू सध्या फॉर्ममध्ये नाहीत. त्यामुळे आजच्या सामन्यात वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन कशी कामगिरी करणार हे पाहावे लागेल.

चेन्नई संघाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन :

डेव्हॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, शिवम दुबे, रवींद्र जाडेजा (कर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक), महीश थिक्षाना/ख्रिस जॉर्डन, ड्वेन ब्राव्हो, तुषार देशपांडे, अॅडम मिल्ने

केकेआर संघाचे प्लेइंग इलेव्हन :

व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्ज (यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, चमिका करुणारत्ने, सुनील नरेन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव</p>