MS Dhoni gives autograph to Sunil Gavaskar: आयपीएल २०२३च्या ६१व्या सामन्यानंतर मैदानावर असे काही घडले ज्याची महेंद्रसिंग धोनीच्या कोणत्याही चाहत्याला अपेक्षा नसेल. भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर हे मैदानात धावत-धावत माहीजवळ आले पोहोचवले आणि त्याच्या शर्टवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. धोनीने महान फलंदाज लिटल मास्टर गावसकरांच्या विनंतीला मान देऊन छानशी अशी  ऑटोग्राफ दिली. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधार धोनीने मोठे मन दाखवत गावसकरांना भर मैदानात हा ऑटोग्राफ घेतला. क्रिकेट जगतातील भारताच्या या दोन दिग्गजांचा हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्यासारखा होता. या सुंदर घटनेचा साक्षीदार झालेल्या तेथील सर्व खेळाडू आणि चाहत्यांना खूप अभिमान वाटला असेल यात कुठलीच शंका नाही.

इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक क्षण काल रात्री पाहावयास मिळाला. जेव्हा महान सुनील गावसकर एका सामान्य चाहत्याप्रमाणे ऑटोग्राफ घेण्यासाठी महेंद्रसिंग धोनीच्या मागे धावू लागले. निमित्त होते चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जच्या १६व्या हंगामातील शेवटच्या सामन्याचे, जो १४मे रोजी म्हणजेच रविवारी रात्री कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळला गेला. धोनीच्या संघाने कदाचित सामना गमावला असेल, परंतु चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण संघ एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर त्यांच्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी संपूर्ण मैदानाला चक्कर मारत होता, त्यात अचानक भारताचे महान फलंदाज लिटिल मास्टर गावसकर मागून आले आणि त्यांनी धोनीकडे त्यांच्या शर्टवर ऑटोग्राफ घेतली. हे भारतीय क्रिकेटमधील दोन महान कर्णधार, महान फलंदाजांच्या भेटीचा क्षण सर्व चेन्नई वासियांनी आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.

Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
devendra fadnavis sharad pawar
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, महायुतीशी जवळीक वाढतेय? फडणवीस सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Sharad Pawar appreciate Rss work , Sharad Pawar,
संघाच्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विधानसभा निवडणुकीत गाफील राहिल्याची कबुली
dhananjay Munde
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपचा दबाव; मित्रपक्षाच्या नेत्यांची आक्रमक भूमिका
Yuvraj Singh Backs Rohit Sharma Virat Kohli Amid Heavy Criticism on Poor Form
VIDEO: रोहित-विराटच्या मदतीला धावला युवराज सिंग; ट्रोलर्सचा समाचार घेताना म्हणाला…
Karuna Munde Said Thanks to Suresh Dhas
Karuna Munde : करुणा धनंजय मुंडेंनी मानले सुरेश धस यांचे आभार; म्हणाल्या, “माझ्याकडे खूप पुरावे……”
Rishabh Pant Statement on Rohit Sharma Dropping Himself From Sydney Test Said It was Emotional Call IND vs AUS
IND vs AUS: “रोहित शर्मा बाहेर बसणं आमच्यासाठी भावनिक…”, ऋषभ पंतचं सिडनी कसोटीदरम्यान भावुक करणारं वक्तव्य; पाहा VIDEO

दोन दिग्गजांची ग्रेट-भेट

कोलकाताचा सामना संपल्यावर धोनीची एक छोटेखानी मुलाखत झाली. ही मुलाखत संपल्यावर चेन्नईच्या संघाचा पूर्ण स्टाफ त्याची वाट पाहत होता. कारण खेळाडूंनी हातात बऱ्याच भेटवस्तू घेतल्या होत्या. या भेटवस्तू माही आपल्या चाहत्यांना देणार होता. चेन्नईच्या संघातील अनेक खेळाडू धोनीच्या हातात या वस्तू देत होते आणि धोनी ते स्टेडियममधील चाहत्यांच्या दिशेने भिरकावत होता. त्यावेळी चाहते या भेटवस्तू आपल्याला मिळाव्यात यासाठी जोरदार प्रयत्न करत होते पण ही सर्व गोष्ट सुरु असताना मैदानात धोनीला भेटायला आले ते सुनील गावसकर.

आपल्या ज्येष्ठ सुनील गावसकर यांना ऑटोग्राफ देणे हा धोनीसाठी अभिमानाचा क्षण असावा. अशा परिस्थितीत जेव्हा धोनीने लिटिल मास्टरच्या शर्टवर ऑटोग्राफ द्यायला सुरुवात केली तेव्हा संपूर्ण स्टेडियम जल्लोष करू लागला. कॉमेंट्री करणारे गावसकर सामना संपल्यानंतर पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी पोहोचले तेव्हा काही मिनिटांपूर्वी टीव्हीवर जगासमोर घडलेल्या या ऐतिहासिक घटनेचा उल्लेख करायला ते विसरले नाहीत.

पोस्ट मॅच शो दरम्यान सुनील गावसकर यांनी कॅमेरामनला शर्ट झूम करण्यास सांगितले कारण त्यांना माहीचा ऑटोग्राफ दाखवायचा होता. गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले, “धोनीवर कोण प्रेम करत नाही? गेल्या काही वर्षांत त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे केले ते खूप अलौकिक आहे. मुख्य म्हणजे तो एक तरुण खेळाडूंचा आदर्श राहिला आहे. त्यामुळे अनेक तरुण त्याच्याकडे बघून शिकत आहेत. तो संपूर्ण टीमसोबत मैदानावर फेरफटका मारणार हे ऐकताच मी कोणाकडून तरी पेन उसना घेतला आणि शांतपणे माझ्याकडे ठेवला.” गावसकर भेटायला आल्याचे कळताच धोनीही थोडा थांबला. त्याने आपल्या चाहत्यांना भेटवसू देणे थोडा वेळ थांबवले. त्यानंतर एम.एस. आणि सुनील गावसकर यांच्यामध्ये काही काळ चर्चा झाली. हे सर्व झाल्यावर धोनीने थेट आपला हात त्यांच्या शर्टच्या जवळ नेला. त्याने गावसकरांना त्यांच्या शर्टवर आपली ऑटोग्राफ दिली आणि त्या दोघांमध्ये स्मितहास्य पाहायला मिळाले. ऑटोग्राफ मिळाल्यावर गावसकर यांनी धोनीला मिठी मारली आणि त्यानंतर त्यांनी त्याला शुभेच्छाही दिल्या. 

Story img Loader