IPL 2025 MS Dhoni Deepak Chahar Banter CSK vs MI: आयपीएल २०२५ मधील तिसरा सामना आयपीएलमधील दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये खेळवला गेला. मुंबई वि. चेन्नईच्या या सामन्यात सीएसकेच्या संघाने बाजी मारत विजय मिळवला. आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वी झालेल्या महालिलावामुळे सर्वच संघांमध्ये बदल झाले आहेत. यादरम्यान गेले काही वर्ष चेन्नईच्या ताफ्यात असलेला दीपक चहर मुंबई इंडियन्सकडून यंदा खेळत आहे.
यंदा आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळत असलेल्या दीपक चहरने धोनीला आणि जडेजाला मैदानावर स्लेज करतानाचा व्हीडिओ पाहायला मिळत आहे. धोनी फलंदाजीसाठी क्रिजवर आला तेव्हा दीपक चहरने त्याला स्लेजिंग करण्यास सुरुवात केली. मात्र, नेहमीप्रमाणे धोनी शांत राहिला आणि सामन्यावर त्याने लक्ष दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दीपक चहरने धोनी-जडेजाला केलं स्लेज
दीपक चहर आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यात खूप जुनी मैत्री आहे आणि दोन्ही खेळाडू एकमेकांचा आदर करतात. चेन्नईकडून खेळताना दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग तयार झालेलं पाहायला मिळालं आहे. मात्र, माही फलंदाजीला येईपर्यंत सीएसकेचा विजय निश्चित झाला होता. यादरम्यान धोनी मैदानावर आल्याचे पाहताच त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी चहर त्याच्या जवळ गेला अन् काहीतरी बोलू लागला आणि मग टाळ्या वाजवू लागला.
Deepak Chahar encouraging Jadeja and MS Dhoni. ?pic.twitter.com/DNCHSaF74s
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 24, 2025
दीपक चहरने स्लेजिंग करताना पाहत धोनीने त्याला काहीचं उत्तर दिलं नाही आणि त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते. तो क्रीजवर शांतपणे उभा राहून सामन्यावर लक्ष देत होता. दीपक चहरने या सामन्यात आपली कामगिरी चोख बजावली. त्याने फलंदाजी करताना २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली तर दुसऱ्याच षटकात विकेट घेत मुंबईला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
धोनीने स्लेजिंगचा दीपक चहरकडून असा घेतला बदला
सामना संपल्यानंतर धोनी मैदानात उभा राहून मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंशी हस्तांदोलन करत होता. तितक्यात धोनीला पाहत दीपक चहर पुढे जाताच धोनीने त्याला मजेत बॅटने मारलं. हा व्हीडिओ पाहताना कॉमेंट्री करणाऱ्या आकाश चोप्राने तितक्यात म्हटलं, “माही भाई एक शॉट तर मारायचा.. (क्या माही भाई एक शॉट तो मार देते…)” या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते याला माहीची बदला घेण्याची स्टाईल म्हणत आहेत. दीपक चहरने मैदानात धोनी फलंदाजीला आला तेव्हा स्लेज केलं होतं त्याचा बदला धोनीने घेतल्याचं म्हटलं. धोनी पहिल्या सामन्यात २ चेंडू खेळत एकही धाव घेऊ शकला नाही आणि रचिन रवींद्रच्या विजयी षटकारासह चेन्नईने विजय नोंदवला.
MS Dhoni giving BAT treatment to Deepak Chahar?pic.twitter.com/2uYGLkFdpy
— ` (@lofteddrive45) March 23, 2025
Dhoni being Dhoni, Chahar being the usual victim.??#MSDhoni #Thala #CSKvsMI pic.twitter.com/VE4rwOFXAn
— Indian Cricket Fc (@Jonathan_fcc) March 24, 2025
मुंबई इंडियन्सने IPL 2025 मध्ये चाहरला ९.२५ कोटी रुपयांना संघात सामील केले आहे. त्याने आपला पदार्पण सामना चेन्नईविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याला एकच विकेट घेता आली. याआधी तो चेन्नई सुपर किंग्जकडून सलग ७ वर्षे खेळला होता.