आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील २२ व्या सामन्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा २३ धावांनी पराभव झाला. तर चेन्नई सुपर किंग्जने या हंगामातील पहिला विजय मिळवला. कर्णधारपद स्वीकारल्यापासून चेन्नईचा हा पहिलाच विजय असल्यामुळे जाडेजाने हा विजय त्याची पत्नी आणि संघातील इतर खेळाडूंना समर्पित केला आहे. दरम्यान या सामन्याने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये डिस्ने पल्स हॉटस्टावर हा सामना सर्वात जास्त वेळा पाहिला गेला आहे.
हेही वाचा >>> IPL 2022 : हवेत झेप घेत एका हाताने टिपला झेल, आकाश दीप झाला शून्यावर बाद, अंबाती रायडूची एकच चर्चा
disney+ hotstar वर हा समना तब्बल ८.२ मिलियन लोकांनी लाईव्ह पाहिला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई विरुद्ध बंगळुरु सामन्याअगोदार २१ सामने झाले आहेत. मात्र या सामन्याला आतापर्यंत सर्वाधिक लोकांनी लाईव्ह पाहिले. हा सामना सुरु असताना एकाच वेळेला ८.२ मिलियन म्हणजेच ८२ लाख लोक डिस्ने प्लस हॉटस्टावर लाईव्ह होते.
हेही वाचा >>> कर्णधार म्हणून मिळालेला पहिला विजय जाडेजाने पत्नीला केला समर्पित, म्हणाला, माझ्या…
दरम्यान या सामन्याकडे चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि बंगळुरुचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्या विरोधातील लढत म्हणून पाहिले जात होते. या सामन्यात विराट कोहली अवघी एक धाव करून बाद झाला. तर दुसरीकडे वीस षटके संपल्यामुळे चेन्नईच्या महेंद्रसिंह धोनीला एकही धाव करता आली नाही. या दोन्ही खेळाडूंना फलंदाजीमध्ये चमकता आलेलं नसलं तरी चेन्नई संघाच्या इतर खेळाडूंनी धमाकेदार खेळी केली.
हेही वाचा >>> Video : माहीचा कूल अंदाज ! दोन कॅच सोडणाऱ्या मुकेश चौधरीला दिला दिलासा, खांद्यावर हात ठेवून…
चेन्नईच्या रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे या जोडीने बंगळुरुच्या गोलंदाजाला झोपडून काढले. रॉबिन उथप्पाने ८८ धावा केल्या. तर शिवम दुबेने ९५ धावा केल्या. २० षटके संपल्यामुळे दुबेचे शतक पाच धावांनी हुकले. या सामन्यात चेन्नईने २१६ धावांचा डोंगर उभारला. पण बंगळुरु संघ १९३ धावा करु शकला.