Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings IPL Match Updates: आयपीएलच्या २४व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होत आहे. दोन्ही संघ सोमवारी (१७ एप्रिल) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईचा या मोसमातील हा पाचवा सामना आहे. आतापर्यंत त्याने दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. त्याचवेळी आरसीबीने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साऊथ डर्बीमध्ये आजचा सामना सुरु असून त्यात चेन्नईने डावाची चांगली सुरुवात केली. मात्र मोहम्मद सिराजने चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का दिला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने ऋतुराज गायकवाडला बाद केले. त्याचा झेल वेन पारनेलने घेतला. ऋतुराजने सहा चेंडूत तीन धावा केल्या. चेन्नईने तीन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्या आहेत. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये चेन्नईचे अर्धशतक करून दिले. चेन्नई सुपर किंग्जच्या डावाचा पॉवरप्ले संपुष्टात आला आहे. त्याने सहा षटकात एका विकेटसाठी ५३ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे १४ चेंडूत २८ आणि डेव्हन कॉनवे १६ चेंडूत २२ धावांवर नाबाद आहे.

अजिंक्य रहाणेने विजयकुमार व्यस्कला ९१ मीटर गगनचुंबी षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. त्याचा हा षटकार थेट एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावरून थेट बाहेर गेला. वनिंदू हसरंगाने आरसीबीला दुसरे यश मिळवून दिले. त्याने १०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला क्लीन बोल्ड केले. रहाणे २० चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. रहाणेने डेव्हॉन कॉनवेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर डेव्हॉन कॉनवेने त्याच षटकात आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईने १० षटकांत २ बाद ९७ धावा केल्या आहेत.

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे शेवटचं चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्र खेळणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम,एस.धोनी याची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सामना सुरू होण्याच्या जवळपास ३-४ तास आधीच प्रेक्षकांची स्टेडियमबाहेर भलीमोठी रांग पाहायला मिळाली. स्टेडियमवर चेन्नई अन् माहीचाच जयघोष पाहायला मिळाला. बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीला धोनीला आलेलं पाहून चाहत्यांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं.. गुडघ्याच्या दुखापतीमुळे धोनी खेळणार नसल्याची चर्चा होती.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Csk vs rcb score ajinkya rahanes amazing skyscraper six watch video avw
Show comments