Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings IPL Match Updates: साऊथ डर्बीमध्ये आजचा सामना बंगळुरूमध्ये एम. चिन्नास्वामी सुरु आहे. आयपीएलच्या २४व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होत आहे. दोन्ही संघ सोमवारी (१७ एप्रिल) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने २० षटकांत ६ बाद २२६ धावा केल्या. त्यात सर्वांच्या नजरा या अनुष्का शर्मावर टिकून आहेत. कधी आनंदी तर कधी असे तिचे हावभाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चेन्नईने तीन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्या आहेत. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये चेन्नईचे अर्धशतक करून दिले. चेन्नई सुपर किंग्जच्या डावाचा पॉवरप्ले संपुष्टात आला आहे. त्याने सहा षटकात एका विकेटसाठी ५३ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने विजयकुमार व्यस्कला ९१ मीटर गगनचुंबी षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. त्याचा हा षटकार थेट एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतावरून थेट बाहेर गेला.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Suryakumar Yadav video with Pakistani fan goes viral :
Suryakumar Yadav : तुम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात का येत नाही? चाहत्याच्या प्रश्नावर सूर्या म्हणाला, ‘हे आमच्या…’
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

वनिंदू हसरंगाने आरसीबीला दुसरे यश मिळवून दिले. त्याने १०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला क्लीन बोल्ड केले. रहाणे २० चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. त्यानंतर अनुष्का शर्माने आनंदाने कौतुक करत टाळ्या वाजवल्या. अशावेळी कॅमेराने तिचे हे आनंदी हावभाव टिपले. हसरंगाचे तिने कौतुक केले.

चेन्नईने ठेवलेल्या २२७ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विराट कोहली लवकर बाद झाला. चेन्नई सुपर किंग्जला पहिल्याच षटकात पहिला यश मिळाले. विराट कोहलीला आकाश सिंगने क्लीन बोल्ड केले. कोहलीला आकाशचा चौथा चेंडू नीट खेळता आला नाही. चेंडू त्याच्या पायाला लागून विकेटवर आदळला. त्यावेळी अनुष्काला धक्का बसला आणि ती नाराज झाली. आजच्या सामन्यात कॅमेरा सतत तिच्यावर असल्याने ‘कभी खुशी कभी गम’ असे तिचे हावभाव दिसत आहेत.

तत्पूर्वी, चेन्नईसाठी डेव्हॉन कॉनवे आणि शिवम दुबे यांनी स्फोटक अर्धशतके ठोकली. कॉनवेने ४५ चेंडूत ८३ तर शिवम दुबेने २७ चेंडूत ५२ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने २० चेंडूत ३७ धावा केल्या. मोईन अली नऊ चेंडूत १९ धावा करून नाबाद राहिला. अंबाती रायुडूने सहा चेंडूंत १४ तर रवींद्र जडेजाने आठ चेंडूंत १० धावांचे योगदान दिले. ऋतुराज गायकवाड तीन धावा करून बाद झाला. त्याचवेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका चेंडूवर एक धाव घेत नाबाद राहिला. आरसीबीच्या मोहम्मद सिराज, वेन पारनेल, विजयकुमार वायसाक, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक यश मिळाले. चेन्नईने आपल्या डावात १७ षटकार ठोकले.

हेही वाचा: CSK vs RCB Score: शिवम-कॉनवेची शानदार अर्धशतकं! चेन्नई सुपर किंग्सचे बंगळुरूसमोर २२७ धावांचे आव्हान

२२६ धावा ही एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी विरुद्ध कोणत्याही संघाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा विक्रम मोडला. २००८ मध्ये कोलकाताने तीन गड्यांच्या मोबदल्यात २२२ धावा केल्या होत्या. त्याचवेळी, राजस्थान रॉयल्सने २०१८ मध्ये चार विकेट गमावत २१७ धावा केल्या होत्या.