Royal Challengers Bangalore vs Chennai Super Kings IPL Match Updates: आयपीएलच्या २४व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होत आहे. दोन्ही संघ सोमवारी (१७ एप्रिल) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. चेन्नईचा या मोसमातील हा पाचवा सामना आहे. आतापर्यंत त्याने दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. त्याचवेळी आरसीबीने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. चेन्नईने धुव्वाधार फलंदाजी करत कॉनवे-शिवमच्या अर्धशतकांमुळे चेन्नईने बंगळुरूसमोर २२७ धावांचे आव्हान ठेवले.

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची सुरुवात खराब झाली. फॉर्ममध्ये असणारा ऋतुराज गायकवाड लवकर बाद झाला. मोहम्मद सिराजने चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का दिला, त्याने सहा चेंडूत अवघ्या तीन धावा केल्या. चेन्नईने तीन षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेने आक्रमक सुरुवात करत पॉवर प्लेमध्ये चेन्नईचे अर्धशतक पूर्ण करून दिले. पॉवर-प्लेमध्ये त्या दोघांनी मिळून ५३ धावा केल्या केल्या.

IPL 2025 Mega Auction RCB Players List
RCB IPL 2025 Full Squad: कोण असणार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नवे शिलेदार?
IPL 2025 Mega Auction RR Players List
RR IPL 2025 Full Squad: राजस्थान रॉयल्सचा संघ…
IPL 2025 Mega Auction KKR Players List
KKR IPL 2025 Full Squad: श्रेयस अय्यरला रिलीज केल्यानंतर कसा असू शकतो केकेआरचा संघ, लिलावात कोणावर लावणार बोली?
IPL 2025 Mega Auction LSG Players List
LSG IPL 2025 Full Squad: लखनौ सुपर जायंट्सचा संघ कोणत्या खेळाडूंसाठी RTM कार्ड वापरणार?
: IPL 2025 Mega Auction CSK Players List
CSK IPL 2025 Full Squad : चेन्नई सुपर किंग्जचा संघ ५ खेळाडूंना रिटेन केल्यानंतर कोणावर लावणार बोली?
IPL 2025 Mega Auction DC Players List
DC IPL 2025 Full Squad: ऋषभ पंतला रिलीज केल्यानंतर कसा असू शकतो दिल्लीचा संघ, लिलावात कोणासाठी वापरणार RTM कार्ड?
IPL 2025 Mega Auction GT Players List
GT IPL 2025 Full Squad: गुजरात टायटन्सचा संघ ५ खेळाडूंना रिटेन केल्यानंतर कोणावर लावणार बोली?
IPL 2025 Mega Auction SRH Players List
SRH IPL 2025 Full Squad: सनरायझर्स हैदराबादचा संघ लिलावासाठी सज्ज, कोणावर लागणार बोली?

हसरंगाने आरसीबीला दुसरे यश मिळवून दिले. त्याने १०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला क्लीन बोल्ड केले. रहाणे २० चेंडूत ३७ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. रहाणेने डेव्हॉन कॉनवेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर डेव्हॉन कॉनवेने त्याच षटकात आयपीएलमधील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. कॉनवेने शिवम दुबेला साथीला घेत धावफलक हलता ठेवला. १६व्या षटकात चौथ्या चेंडूवर हर्षल पटेलने डेव्हॉन कॉनवेला क्लीन बोल्ड केले. कॉनवे ४५ चेंडूत ८३ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. कॉनवेने शिवम दुबेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ८० धावांची भागीदारी केली.

हेही वाचा: CSK vs RCB Score: ‘तो आला, त्याने पाहिले अन् थेट स्टेडियमच्या बाहेर…’; अजिंक्य रहाणेचा अप्रतिम गगनचुंबी षटकार, पाहा Video

चेन्नई सुपर किंग्जला सलग दोन षटकांत दोन धक्के बसले. वेन पारनेलने १७व्या षटकात शिवम दुबेला बाद केले. शिवम दुबे २७ चेंडूत ५२ धावा करून सिराजकडे झेलबाद झाला. दुबेने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. त्याच्यानंतर विजयकुमारने १८व्या षटकात अंबाती रायडूला बाद केले. रायुडू सहा चेंडूत १४ धावा करून दिनेश कार्तिककडे झेलबाद झाला. त्याचवेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका चेंडूवर एक धाव घेत नाबाद राहिला. आरसीबीच्या मोहम्मद सिराज, वेन पारनेल, विजयकुमार वायसाक, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक यश मिळाले. चेन्नईने आपल्या डावात १७ षटकार ठोकले.