Chennai Super Kings vs Rajasthan Royals IPL Match Updates: आयपीएल २०२३च्या ३७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. राजस्थानचा संघ गेल्या दोन सामन्यात पराभूत झाला आहे, तर सीएसकेचा संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या तीन सामन्यात त्याने विजय मिळवला आहे. सीएसकेचा संघ गुणतालिकेत अव्वल, तर राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि जॉस बटलर यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. त्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्ससमोर २०३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर २०० हून अधिक धावा झाल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा केल्या. राजस्थानची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ५० चेंडूत ८६ धावांची भागीदारी केली.
रवींद्र जडेजाने ही भागीदारी तोडली. त्याने जोस बटलरला शिवम दुबेकरवी झेलबाद केले. त्याला २१ चेंडूत २७ धावा करता आल्या. दुसऱ्या टोकाला यशस्वीने झटपट फटके मारले आणि २६ चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील सहावे अर्धशतक पूर्ण केले. यानंतर १४व्या षटकात तुषार देशपांडेने दोन गडी बाद केले. त्याने प्रथम कर्णधार संजू सॅमसनला ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केले. सॅमसनला १७ चेंडूत १७ धावा करता आल्या. यानंतर यशस्वीला रहाणेने झेलबाद केले. यशस्वीला ४३ चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ७७ धावा करता आल्या.
शिमरॉन हेटमायर विशेष काही करू शकला नाही आणि आठ धावा करून महेश टीक्षानाने क्लीन बोल्ड केले. यानंतर ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी पाचव्या विकेटसाठी २१ चेंडूत ४८ धावांची भागीदारी केली. ध्रुव १५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३४ धावा करून बाद झाला. पडिक्कलने १३ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावा केल्या. त्याचवेळी अश्विन एक धाव घेत नाबाद राहिला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन बळी घेतले. त्याचवेळी तिक्षणा आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हे आहेत दोन संघ
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
राजस्थान रॉयल्सचे इम्पॅक्ट प्लेअर: डॉनव्हॉन फरेरा, मुरुगन अश्विन, रियान पराग, केएम आसिफ, कुलदीप यादव.
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे, महेश टेकशाना.
चेन्नई सुपर किंग्जचे इम्पॅक्ट प्लेअर: अंबाती रायुडू, ड्वेन प्रिटोरियस, सुभ्रांशु सेनापती, शेख रशीद, राजवर्धन हंगरगेकर.