Rajasthan Royals vs Chennai Super Kings Todays IPL Match Updates: आयपीएल २०२३ मध्ये बुधवारी (१२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळला गेला. दोन्ही संघांनी दोन सामने जिंकले आहेत आणि तिसऱ्या विजयासह गुणतालिकेत आपले स्थान सुधारू इच्छित आहे. या सामन्यात धोनी २००व्यांदा चेन्नईचे नेतृत्व करत असून हा विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. अशा स्थितीत विजयासह त्याला हा सामना आपल्यासाठी खास बनवायचा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यामुळे राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. या संधीचे देखील सोने करत राजस्थानच्या फलंदाजांनी पावर प्लेमध्ये वेगवान धावा वसूल केल्या. यासोबतच त्यांनी आयपीएलच्या या हंगामात एक नवा पराक्रम देखील आपल्या नावे केला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर राजस्थानची सुरुवात काहीशी खराब झाली. यशस्वी जयस्वाल दुसऱ्याच षटकात १० धावा करत तंबूत परतला. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळालेल्या देवदत्त पडिकल याने आक्रमण सुरूच ठेवले. त्याला जॉस बटलर याने देखील तशीच साथ दिली. दोघांनी पुढील चार षटकात ४५ धावा कुटल्या. या दोघांनी पॉवर प्ले मध्ये संघाची धावसंख्या १ बाद ५७ पर्यंत पोहोचवली.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन भोपळाही फोडण्यात अपयशी ठरला, त्यानंतर आलेला चेन्नईचा खेळाडू पण सध्या राजस्थानकडून खेळनारा रविचंद्रन अश्विनने बटलरला साथ देत अर्धशतकी भागीदारी केली. तो २२ चेंडूत ३८ धावा करत त्याचा टीम इंडियाचा गोलंदाजीतील साथीदार जडेजाकरवी झेलबाद झाला. १८ चेंडूत ३० धावा करत वेस्ट इंडीजच्या शिमरॉन हेटमायरने १५०चा टप्पा पार करण्यास मदत केली. जुरेल, जेसन होल्डर आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात सामील झालेला अॅडम झॅम्पा देखील फारशी काही चमक दाखवू शकला नाही. जॉस बटलरही मोठा फटका मारण्याच्या नादात ३६ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. त्यांने १ चौकार आणि ३ षटकार मारत त्याच्या खेळीला रंग आणला.
चेन्नईच्या फिरकीपटूंनी स्पिन द ट्विन्सची करामत दाखवत भेदक गोलंदाजी केली. राजस्थानच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. आकाश सिंग, रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या तर मोईन अलीला एक विकेट घेण्यात यश मिळाले.
राजस्थान रॉयल्स या हंगामातील एकमेव संघ आहे ज्यांनी चारही सामन्यात पावर प्लेमध्ये ५० धावांचा टप्पा पार केला. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिल्या सामन्यात राजस्थानने एक गडी गमावत विक्रमी ८५ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर पंजाब विरुद्ध तीन गडी गमावले असतानाही ८७ धावा बनवण्यात यश मिळवले होते. दिल्लीविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वाल व बटलर यांनी ६८ धावा बनवलेल्या. त्यानंतर आता चौथ्या सामन्यातही ५७ धावा राजस्थानचे फलंदाज बनवू शकले.