डेव्हिड वॉर्नरचे धडाकेबाज अर्धशतक आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जवर २२ धावांनी विजय मिळवला.
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना ब्रेंडन मॅक्क्युलमने पाच चेंडूंमध्ये तीन चौकार लगावत १२ धावा फटकावल्या. पण त्यानंतर चेन्नईच्या संघाने ठराविक फरकाने फलंदाज गमावले आणि त्यांच्या हातून सामना निसटला.
त्याआधी, डेव्हिड वॉर्नरच्या स्फोटक खेळीचा नजराणा पुन्हा एकदा शनिवारी पाहायला मिळाला. आपल्या घाणाघाती फटक्यांच्या जोरावर वॉर्नरने चेन्नईच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच आक्रमण केले. आतापर्यंत दमदार कामगिरी करणाऱ्या मोहित शर्माला तर वॉर्नरने धारेवर धरले होते. वॉर्नरने आठ सामन्यांमध्ये ३७८ धावा करत ‘ऑरेंज कॅप’ पटकावली आहे. वॉर्नरने यावेळी राजस्थान रॉयल्सच्या अजिंक्य रहाणेला मागे टाकले. वॉर्नरने फक्त २८ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६१ धावांची वादळी खेळी साकारली. त्यामुळे हैदराबादनेच २० षटकांत ७ बाद १९२ धावांचे आव्हान उभे केले.
वॉर्नर आणि शिखर धवन (३७) यांनी यावेळी ८६ धावांची सलामी दिली, त्यामध्ये वॉर्नरचा ६१ धावांचा वाटा होता. वॉर्नर बाद झाल्यावर चेन्नईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या धावसंख्येवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकाही फलंदाजाला चेन्नईवर जास्त आक्रमण करता आले नाही. पण मधल्या फळीतील काही फलंदाजांनी फटकेबाजी केली.
हैदराबादकडून मोझेस हेन्रिक्सने ९ चेंडूंत एक चौकार आणि दोन षटकार लगावत १९ धावा फटकावल्या. शिखर धवनला मात्र पुन्हा एकदा जोरदार आक्रमण करण्यात अपयश आले. धवनने ३२ चेंडूंमध्ये ४ चौकारांच्या साहाय्याने ३७ धावा केल्या. चेन्नईकडून सुरेश रैनाने वॉर्नरचा अडसर दूर करत संघाला मोठे यश मिळवून दिले. वॉर्नर बाद झाल्यावर ड्वेन ब्राव्होने २५ धावांमध्ये तीन बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १९२ (डेव्हिड वॉर्नर ६१; ड्वेन ब्राव्हो ३/२५) विजयी वि. चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ६ बाद १७० (फॅफ डय़ू प्लेसिस ३३; मोइसेस हेनरिस्क २/२०).

संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ७ बाद १९२ (डेव्हिड वॉर्नर ६१; ड्वेन ब्राव्हो ३/२५) विजयी वि. चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ६ बाद १७० (फॅफ डय़ू प्लेसिस ३३; मोइसेस हेनरिस्क २/२०).