IPL 2025 CSK vs SRH Highlights: चेन्नईचा गड असलेल्या चेपॉकच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच पराभूत करत इतिहास लिहिला. हैदराबादने चेन्नईचा ५ विकेट्स आणि ८ चेंडू राखत पराभव केला. यासह हैदराबादने गुणातालिकेत आठव्या स्थानी झेप घेतली आहे. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावांचं आव्हान दिलं होतं. जे हैदराबादने १८.४ षटकांत गाठत महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली आहे.

Live Updates

IPL 2025 Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad Highlights: आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे हायलाईट्स

22:44 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: इशान किशन झेलबाद

वादळी फटकेबाजीनंतर इशान किशन नूर अहमदच्या षटकात झेलबाद झाला. यासह इशान ४४ धावा करत बाद झाला आणि चेन्नईच्या संघाने सामन्यात पुनरागमन केलं आहे.

22:22 (IST) 25 Apr 2025
CSK vs SRH LIVE: क्लासेन झेलबाद

नवव्या षटकातील रवींद्र जडेजाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत वर उंच उडाला आणि दीपक हुडाने कोणतीही चूक न करता योग्य झेल टिपला. यासह आता हैदराबादला विजयासाठी ७१ चेंडूत १०१ धावांची गरज आहे.

22:09 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: हेड क्लीन बोल्ड

पॉवरप्लेम२धील अखेरच्या षटकात अंशुल कंबोजने ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. यासह हैदराबादने पॉवरप्लेमध्ये दोन्ही सलामीवीरांना गमावत ३२ धावा केल्यात.

21:42 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: अभिषेक शर्मा झेलबाद

चेन्नईने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अभिषेक शर्माला दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतावं लागलं. यासह हैदराबादने शून्यावर पहिली विकेट गमावली. तर अभिषेकही खाते न उघडता बाद झाला.

21:25 (IST) 25 Apr 2025
CSK vs SRH LIVE: सीएसके चेपॉकवर ऑल आऊट

प्रथम फलंदाजी करणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ घरच्या मैदानावर चेपॉकमध्ये ऑल आऊट झाला आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच सीएसके चेपॉकच्या मैदानावर सर्वबाद झाली आहे. अखेरच्या षटकात पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दीपक हुडा झेलबाद झाला. यासह चेन्नईने १५४ धावा केल्या आहेत.

21:12 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: दोन षटकात २ विकेट

१८व्या षटकातील कमिन्सच्या तिसऱ्या चेंडूवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला अंशुल कंबोज क्लासेनकरवी झेलबाद झाला. तर पुढच्याच षटकातील पहिल्या चेंडूवर हर्षल पटेलने नूर अहमदला झेलबाद केले. यासह चेन्नईने ९ विकेट्स गमावले आहेत.

21:01 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: धोनी झेलबाद

४००व्या टी-२० सामन्यात एम एस धोनी ६ धावा करत माघारी परतला. संघाला सन्मानजनक धावसंख्येची गरज असताना धोनी इतर फलंदाजांप्रमाणे झटपट बाद झाला आहे.

20:51 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: ४०० वा टी-२० सामना

एम एस धोनी त्याच्या कारकिर्दीतील आज हैदराबादविरूद्ध ४०० वा टी-२० सामना खेळत आहे. चेन्नईने ६ विकेट्स गमावल्यानंतर धोनी फलंदाजीला उतरला आहे.

20:50 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: चेन्न्ईचा निम्मा संघ तंबूत

१४व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जयदेव उनाडकटने शिवम दुबेला झेलबाद केलं. यासह चेन्नईचा निम्मा संघ माघारी परतला आहे. तर चेन्नईने १४ षटकांत ६ बाद ११९ धावा केल्या आहेत.

20:42 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: डेवाल्ड ब्रेविस झेलबाद

१३व्या षटकात हर्षल पटेलने पाचव्या चेंडूवर डेवाल्ड ब्रेविसला झेलबाद केलं. पण या विकेटमागे कामिंदू मेंडिसची मोठी मेहनत होती.कामिंदू मेंडिसने सीमारेषेजवळ एक अनपेक्षित झेल टिपला आहे.

20:39 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: डेवाल्ड ब्रेविसची फटकेबाजी

कामिंदू मेंडिसच्या डावातील १२व्या षटकात ३ षटकार लगावत शानदार फटकेबाजी केली. डेवाल्ड ब्रेविसने या षटकात २० धावा कुटत चेन्नईची धावसंख्या १०० पार नेली. यासह चेन्नईने १२ षटकांत ४ बाद १०७ धावा केल्या.

20:30 (IST) 25 Apr 2025
CSK vs SRH LIVE: रवींद्र जडेजा क्लीन बोल्ड

कामिंदु मेंडिसच्या 10व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रवींद्र डेजा क्लीन बोल्ड झाला. कामिंदु मेंडिस हा दोन्ही हातांनी गोलंदाजी करतो. जडेजा १७ चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह २१ धावा केल्या.

20:07 (IST) 25 Apr 2025
CSK vs SRH LIVE: चेन्नईला दोन षटकात दोन धक्के

पॉवरप्लेमध्येच चेन्नई सुपर किंग्सला ३ धक्के बसले आहेत. शेख रशीद पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर सॅम करन आणि आयुष म्हात्रेने संघाचा डाव सावरला. पण ५व्या षटकात हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर करन बाद झाला तर पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात कमिन्सने आयुष म्हात्रेला झेलबाद केलं. आयुष म्हात्रे १९ चेंडूत ६ चौकारांसह ३० धावा करत बाद झाला. तर सॅम करन ९ धावा करत बाद झाला. यासह चेन्नईने ६ षटकांत ३ बाद ५० धावा केल्या आहेत.

19:34 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: सीएसकेला पहिला धक्का

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईला मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर धक्का दिला आहे. सलामीवीर शेख रशीद स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अभिषेक शर्माकरवी झेलबाद झाला. तर दुसऱ्या चेंडूवर हात स्टम्पला लागल्याने शमीला नो बॉल देण्यात आला.

19:08 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, मोहम्मद शमी</p>

19:07 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग इलेव्हन

शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम कुरान, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकिपर), दीपक हुडा, नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

19:01 (IST) 25 Apr 2025
CSK vs SRH LIVE: नाणेफेक

चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याची नाणेफेक हैदराबादने जिंकली असून संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर सीएसकेचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आहे. चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत. या सामन्यातही चेन्नईने दोन मोठे बदल केले आहेत. यामध्ये रचिन रवींद्रच्या जागी डेवाल्ड ब्रेविस व विजय शंकरच्या जागी दीपक हुडाला संधी देण्यात आली आहे.

18:28 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, इशान किशन, राहुल चहर, ॲडम झाम्पा, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, वियान मुल्डर, कामिंदू मेंडिस, अनिकेत वर्मा, एशान मलिंगा, सचिन बेबी.

18:28 (IST) 25 Apr 2025

CSK vs SRH LIVE: चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ

एमएस धोनी, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथीराना, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हॉन कॉनवे, खलील अहमद, रचिन रवींद्र, अंशुल कंबोज, राहुल त्रिपाठी, सॅम करन, डेवाल्ड ब्रेविस, नॅथन एलिस, दीपक हुड्डा, जेमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, आंद्रे सिद्धार्थ, श्रेयस गोपाल, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख रशीद, ऋतुराज गायकवाड</p>

IPL 2025 CSK vs SRH Highlights: सनरायझर्स हैदराबाद संघाने चेपॉकचा अभेद्य किल्ला भेदत सीएसकेवर शानदार विजय नोंदवला.