IPL 2023 CSK vs LSG Match Updates: चेपॉक स्टेडियमवर लखनऊ सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपरजायंट्सवर १२ धावांनी शानदार विजय मिळवला. सीएसके संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात एलएसजी संघाला ७ बाद २०५ धावाच करता आल्या. या सामन्यात सीएसकेच्या विजयात सब्सीट्यूट खेळाडू म्हणून सहभागी झालेल्या तुषार देशपांडेने महत्वाची भूमिका निभावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तुषार देशपांडेने चेन्नई सुपर किंग्जला मोठे यश मिळवून दिले. तुषारने १६व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धोकादायक फलंदाज निकोलस पूरनला बाद केले. १८ चेंडूत ३२ धावा करून पूरन बेन स्टोक्सकरवी झेलबाद झाला. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार आणि तीन षटकार मारले. त्यामुळे चेन्नई संघाला सामन्यात पुनरागमन करता आल्या. तिथून चेन्नई संघाने सामन्यावर पकड मजबूत करायला सुरुवात केली. त्यानंतर तुषार देशपांडेने आयुष बडोनी तंबूचा रस्ता दाखवला.

सुरुवातीला तुषार देशपांडे सीएसके संघासाठी महागडा ठरला होता. त्याने आपल्या चार षटकांत ४५ धावा दिल्या. यामध्ये त्याच्या ४ वाइड आणि ३ नो बॉलचा समावेश होता. परंतु तरी देखील त्याने योग्य वेळी २ विकेट घेत सीएसके संघाला विजय मिळवून दिला. तसेच सीएसके संघाकडून मोइन अलीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. लखनऊ सुपर जायंट्ससाठी काइल मेयर्सने सर्वाधिक धावा केल्या. मेयर्सने २२ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार मारले. त्याने लखनऊला दमदार सुरुवात करुन दिली होती. परंतु त्याच्या संघाला विजयात रुपांतर करता आले नाही.

हेही वाचा – IPL 2023 LSG vs CSK: लखनऊ-चेन्नई सामन्यापूर्वी पार्थिव पटेलचा खुलासा; म्हणाला, “धोनीला पहिल्यांदा ‘त्या’ सामन्यात भावुक झाल्याचे पाहिले”

पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी –

सीएसकेच्या संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. सीएसकेच्या डावाची सुरुवात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे केली. दोघांनी आपल्या संघाला शानदार सुरुवात करुन दिली. या सलामी जोडीने पहिल्या गड्यासाठी ११० धावांची भागीदारी केली. त्यानंतर ऋतुराज गायकवाड ५७ धावांवर बाद झाला. त्याने ३१ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ४ षटकार लगावले.

धोनीच्या पाच हजार धावा पूर्ण –

ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर डेव्हॉन कॉनवे संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु तो देखील त्याच्या पाठोपाठ बाद झाला. कॉनवेचे अवघ्या तीन धावांनी अर्धशतक हुकले. त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ४७ धावांचे योगदान दिले. त्यानंतर मोईन अली (१९), शिवम दुबे (२७), अंबाती रायुडू (२६), बेन स्टोक्स (९) बाद झाले. त्यानंतर आलेल्या धोनीने सलग दोन षटकार मारत आपल्या पाच हजार धावांचा टप्पा पार केला. धोनी आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा करणारा सातवा खेळाडू ठरला आहे.