David Warner IPL 2023 Record : आयपीएल २०२३ च्या ११ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेविड वार्नरने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगतदार सामना झाला. या सामन्यात दिल्लीचा ५७ धावांनी दारुण पराभव झाला. पण कर्णधार डेविड वार्नरने आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान ६००० धावा करण्याचा विक्रम केला आहे.

वॉर्नरने धावांचा हा विक्रम फक्त १६५ इनिंगमध्ये पूर्ण केला आहे. याआधी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने १८८ इनिंगमध्ये हा खास पराक्रम केला होता. आयपीएलच्या इतिहासात ६००० किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवण्याच्या लिस्टमध्ये वार्नर, विराट कोहली आणि शिखर धवननंतर तिसरा खेळाडू बनला आहे. धवनला इतक्या धावा पूर्ण करण्यासाठी १९९ सामने खेळावे लागले होते.

IND vs AUS virat Kohli Is Emotional Said Glenn MacGrath Urges Australia to Go Hard on Him in Border Gavaskar Trophy
IND vs AUS: “विराट कोहली भावनिक आहे, त्याचा फायदा…”, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने कांगारू संघाला दिला मोलाचा सल्ला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Indian Cricket Team Creates History Becomes First Team To Score 5 T20I International Century in 2024 IND vs SA Tilak Varma
IND vs SA: तिलक वर्माच्या शतकासह भारतीय संघाने घडवला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये २०२४ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला संघ
Ricky Ponting Hits Back at Gautam Gambhir over Virat Kohli Form Remarks Said He is quite a prickly character
Ricky Ponting on Gautam Gambhir: “स्वभावच इतका चिडचिडा…”, गौतम गंभीरबाबत रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य, विराट कोहलीच्या फॉर्मवरून रंगला वाद

नक्की वाचा – IPL 2023: एम एस धोनीनंतर कोण असेल CSK चा कर्णधार? मोईन अलीने ‘या’ दिग्गज खेळाडूचं नाव सांगितलं

राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करून दिल्ली कॅपिटल्ससमोर २०० धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ९ विकेट्स गमावून १४२ धावा केल्या. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा या सामन्यात ५७ धावांनी पराभव झाला. राजस्थानसाठी जोस बटलर आणि जैस्वालने धडाकेबाज फलंदाजी करत पहिल्या विकेटसाठी ५१ चेंडूत ९८ धावांची भागिदारी रचली. जैस्वालने ३१ चेंडूत ६० धावा केल्या. तर बटलरने ५१ चेंडूत ७९ धावा कुटल्या. दिल्लीकडून कर्णधार डेविड वार्नरने सर्वाधिक ६५ धावांची खेळी साकारली. परंतु, वार्नरला दिल्ली कॅपिटल्सला विजयाच्या दिशेनं नेता आलं नाही.