आयपीएलचे पंधरावे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी संघांमध्ये चुरस लागली आहे. काल झालेल्या दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील लढत तर चांगलीच रोमहर्षक ठरली. या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जला धूळ चारली. या सामन्यात दिल्लीचा विजय झालेला असला तरी संघातील स्टार फलंदाज डेविड वॉर्नरसाठी हा दिवस काळा ठरला. कारण या सामन्यात वॉर्नर तब्बल ९ वर्षांनी गोल्डन डकवर बाद झाला. विशेष म्हणजे या सामन्यात त्याच्यासोबत एक दुर्दैवी योगायोग घडला.

हेही वाचा >> मुंबई इंडियन्सचे बळ वाढणार, सूर्यकुमार यादवच्या जागेवर ‘हा’ दिग्गज खेळाडू ताफ्यात दाखल

या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्यचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीचे डेविड वॉर्नर आणि सरफराझ खान सलामीला आले. सामना सुरु होताना सरफराझ खान स्ट्राईसाठी गेला होता. मात्र ऐनवेळी डेविड वॉर्नरने त्याला नॉनस्ट्राईकवर जाण्यासाठी सांगितले. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनच्या पहिल्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. राहुल चहरने त्याचा झेल टिपला. आयपीएलच्या इतिहासात तब्बल ९ वर्षांनी वॉर्नर गोल्डन डकवर बाद झाला.

हेही वाचा >> ‘महिला टी-२० चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा; मिताली राज, झुलन गोस्वामी बाहेर

गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर डेविड वॉर्नरसोबत एक दुर्दैवी योगायोग घडला. बरोबर ९ वर्षांपूर्वी आयपीएल २०१३ मध्ये तो सनरायझर्स हैदरबाद संघाकडून खेळत होता. यावेळी पंजाब किंग्ज या संघासोबतच्या सामन्यादरम्यान याच तारखेला म्हणजेच १६ मे रोजी तो गोल्डन डकवर बाद झाला होता. या नऊ वर्षांत तो एकदाही गोल्डन डकवर बाद झाला नव्हता. ९ वर्षांनंतर तो एकाच संघाविरोधात खेळताना एकाच तारखेला गोल्डन डकवर बाद झाला.

हेही वाचा >> अ‍ॅन्ड्र्यू सायमंड्सची शेवटची पोस्ट शेन वॉर्नवर, शेन वॉर्नची रॉड मार्शवर,२ महिन्यांत ३ दिग्गज क्रिकेटपटूंचे निधन

दरम्यान, १६ मे रोजी झालेल्या दिल्ली आणि पंजाब या सामन्यात दिल्लीचा १७ धावांनी विजय झाला. डेविड वॉर्नर चांगली खेळी करु शकला नसला तरी दुसऱ्या खळाडूंनी चांगली कामगिरी केली. मिचेल मार्शने ६३ तर सरफराझ खानने ३२ धावा करत दिल्लीचा डाव सावरला. दिल्लीने वीस षटकात १५९ धावा केल्या. तर पंजाब किंग्जला १४२ धावाच करता आल्या.

Story img Loader