Stolen DC material received: दिल्ली कॅपिटल्स (डीसी) संघ बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) विरुद्ध सामना खेळून दिल्लीला परतला, तेव्हा संघातील खेळाडूंच्या क्रिकेट किटमधून बॅट, पॅड आणि इतर अनेक वस्तू चोरीला गेल्या होत्या. यानंतर आता दिल्ली संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली आहे की, पोलिसांनी चोरी गेलेल्या बहुतांश वस्तूंचा शोध घेतला आहे. वॉर्नरने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये बॅट, पॅड आणि इतर वस्तू स्पष्टपणे दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चोरी झालेल्या वस्तूंबद्दल बोलायचे, तर डेव्हिड वॉर्नर आणि फिल सॉल्टच्या ३-३ महत्त्वाच्या बॅट्सशिवाय मिचेल मार्शच्या २ बॅटही चोरीला गेल्या होत्या. याशिवाय संघातील युवा खेळाडू यश धुलच्या ५ बॅट चोरीला गेल्या होत्या. दिल्लीच्या संघातील खेळाडूंना जेव्हा त्यांचे सामान दिल्लीतील हॉटेलच्या खोलीत पोहोचले, तेव्हा त्यांना याची माहिती मिळाली.

चोरी झाल्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंनी पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर चोरट्यांना पकडण्यासोबतच बहुतांश वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या चोरीला गेलेल्या १-१ बॅटची किंमत सुमारे १ लाख रुपये आहे.

केकेआरची फलंदाजी डीसीच्या गोलंदाजांपुढे कोलमडली –

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंग आणि मनदीप यांच्याशिवाय केकेआरची संपूर्ण बॅटिंग ऑर्डर फ्लॉप ठरली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केकेआरच्या संघाला २० षटकांत अघ्या १२७ धावा करता आल्या. यादरम्यान जेसन रॉयने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. त्याचबरोबर आंद्रे रसेलने ३१ चेंडूत ३८ धावांची अत्यंत संथ खेळी खेळली. रसेलने आपल्या खेळीत १ चौकार आणि ४ षटकार मारले. याशिवाय लिटन दास (४), या मोसमातील दुसरे शतक झळकावणारा व्यंकटेश अय्यर (०), कर्णधार नितीश राणा (४) आणि सुनील नरेन केवळ ४ धावांचे योगदान देऊ शकले.

हेही वाचा – IPL 2023: दिल्ली कॅपिटल्स संघात मोठा बदल, कमलेश नागरकोटीच्या जागी ‘या’ युवा खेळाडूला मिळाली संधी

पाच पराभवानंतर दिल्लीने नोंदवला पहिला विजय –

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल २०२३ ची सुरुवात वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हती. मोसमातील पहिले ५ सामने गमावल्यानंतर, पहिला विजय गुरुवारी केकेआरविरुद्ध मिळवला. दिल्लीने हा सामना चार विकेट्स राखून जिंकला. डीसी सध्या आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत १०व्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner posted an instagram story about the recovery of stolen equipment belonging to delhi capitals players vbm