झटपट अर्धशतक झळकावून डेव्हिड वॉर्नरने रचलेल्या पायावर शिखर धवनने विजयी कळस चढवून सनरायझर्स हैदराबादला पहिला विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला घरच्या मैदानावर हैदराबादने ८बळी राखून पराभूत केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुच्या ख्रिस गेल आणि विराट कोहली (४१) यांनी ४३ धावांची सलामी दिली. प्रविण कुमारने गेलला (२१) बाद करुन हैदराबादला दिलासा मिळवून दिला. कोहली आणि एबी डी व्हिलियर्स (४६) वगळता बंगळुरुच्या एकाही फलंदजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ३७ चेंडूंत ४ चौकार व २ षटकार खेचून ४१ धावा करणाऱ्या कोहलीला रवी बोपाराने त्रिफळाचीत केले. कोहली बाद होताच डीव्हिलियर्सने सामन्याची सुत्रे हाती घेतली आणि १५व्या षटकानंतर आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. १९व्या षटकात बोल्टने डीव्हिलियर्सला बाद केले. डीव्हिलियर्सने २८ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचत ४६ धावा केल्या. त्याच षटकात सीन अॅबॉट आणि हर्षल पटेल यांनाही बोल्टने माघारी धाडले. उरलेली कसर भुवनेश्वर कुमारने पुर्ण करुन बंगळुरुचा डाव १६६ धावांत गुंडाळला.
या माफक धावांचा पाठलाग करताना हैदराबादचे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी पहिल्या षटकापासून बंगळुरुवर हल्ला चढवत ८२ धावांची सलामी दिली. वॉर्नरने २७ चेंडूंत ६ चौकार व ४ उत्तुंग षटकार खेचून ५७ धावांतची ताबडतोड खेळी केली. मात्र, युझवेंद्र चहलने वॉर्नरला पायचीत करुन हैदराबादला पहिला धक्का दिला. त्यापाठोपाठ केन विलियन्मसनही चहलच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. त्यानंतर धवन आणि लोकेश राहुल यांनी संयमी खेळ करून हैदराबादचा विजय निश्चित केला. धवनने ४ चौकार आणि २ षटकरांच्या जोरावर नाबाद ५० धावांची खेळी साकारली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा