David Warner vs Ravindra Jadeja Video Viral : आयपीएल २०२३ चा ६७ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. चेन्नईने प्रथम फलंदाजी करून दिल्लीच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला आणि २० षटकात ३ विकेट्स गमावत २२३ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळं चेन्नईला दोनशे धावांचा टप्पा पार करण्यात यश आलं. त्यानंतर विजयासाठी या धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सची मात्र खराब सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण या सामन्यात एक जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात असताना रविंद्र जडेजाच्या हातात चेंडू गेला. त्यावेळी जडेजाने वॉर्नरला रन आऊट करण्याचा इशारा दिला. पण वॉर्नरनेही जडेजाच्या स्टाईलने बॅटने तलवारबाजी करत त्याची खिल्ली उडवली. वॉर्नरच्या या तलवारबाजीचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नक्की वाचा – मुंबई इंडियन्सच्या ढाण्या वाघाने फोडली डरकाळी! अर्जुन तेंडुलकरने लढवला पंजा, आर्म रेस्टलिंगचा Video झाला व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्जनेही हा व्हिडीओ त्यांच्या ट्वीटर हॅंडलवर शेअर केला असून मजेशीर कॅप्शन दिलं आहे. दोघांमध्ये झालेलं हे शीतयुद्ध कॅमरात कैद झालं असून नेटकऱ्यांनीही यावर भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. तत्पूर्वी, चेन्नई सुपर किंग्जसाठी ऋतुराज गायकवाडने अप्रतिम फलंदाजी करून ५० चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीनं ७९ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसंच कॉन्वेनंही ५२ चेंडूत ३ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीनं ८७ धावा कुटल्या. हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर शिवम दुबेचं वादळ आलं. दुबेनं ९ चेंडूत २२ धावांची खेळी साकारली. तर जडेजानेही धडाकेबाज फलंदाजी करून ७ चेंडूत २० केल्या. धोनी ५ धावांवर नाबाद राहिला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: David warner sword celebration in front of ravindra jadeja video clip viral on twitter csk vs dc ipl 2023 nss