IPL 2023 Delhi Capitals vs Gujarat Titans Match Updates: आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. मात्र, या सामन्याचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने बाद केले, पण बेल्स पडल्या नाहीत आणि लाईटही लागली नाही. त्यामुळे अंपायरने डेव्हिड वॉर्नरला नाबाद घोषित केले.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल –
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर बाद होण्यापासून थोडक्यात बचावला. त्याच वेळी, गुजरात टायटन्सचे खेळाडू रिव्ह्यू घेण्याचा विचार करत राहिले, पण कर्णधार हार्दिक पंड्याने रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. खरे तर त्यावेळी यष्टिरक्षक वृद्धिमान साहा व्यतिरिक्त गुजरात टायटन्सच्या बाकीच्या खेळाडूंना वाटले की चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला, पण चेंडू वार्नरच्या बॅटला लागला नसल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. मात्र चेंडू स्टम्पला स्पर्शून गेला होता. आता हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत आठ गडी गमावून १६२ धावा केल्या. गुजरातला विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. दिल्लीकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने ३२ चेंडूत ३७ तर उपकर्णधार अक्षर पटेलने २२ चेंडूत ३६ धावा केल्या. सरफराज खान ३० आणि अभिषेक पोरेलने २० धावा करून बाद झाले. १० पैकी फक्त चार फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. गुजरात टायटन्ससाठी मोहम्मद शमी आणि राशिद खान यांनी घातक गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. अल्झारी जोसेफला दोन विकेट मिळाल्या.
हेही वाचा – IPL 2023: गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय; केन विल्यमसनच्या जागी ‘हा’ धडाकेबाज खेळाडू केला करारबद्ध
१६३ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या गुजरात टायटन्स संघाने ८ षटकानंतर ३ बाद ६६ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी ७२ चेंडूत ९७ धावांची गरज आहे. सध्या खेळपट्टीलर साई सुदर्शन २५ आणि विजय शंकर ८ धावांवर खेळत आहे. सलामी जोडी साहा आणि गिल दोघेही प्रत्येकी १४-१४ धावांवर बाद झाले. कर्णधार हार्दिक पांड्याही लवकर बाद झाला. तो ५ धावा करुन तंबूत परतला. दिल्ली संघाकडून गोलंदाजी करताना अॅनरिक नॉर्टजेने दोन आणि खलील अहमदने एक विकेट घेतली.