Delhi Capitals and Lucknow Super Giants Highlights: रसिख दर सलामच्या अखेरच्या षटकातील शानदार गोलंदाजीसह दिल्लीने लखनऊवर १९ धावांनी विजय मिळवला. फलंदाजी करताना अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्सचे अर्धशतक आणि शाई होप, ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्लीने २०८ धावा केल्या. या विजयासह दिल्लीने आपले प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. पण दिल्लीच्या विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ आयपीएल २०२४ प्लेऑफमध्ये जाणारा अधिकृतपणे दुसरा संघ ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिल्लीने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊचा संघ १८९ धावाच करू शकला. आयपीएल २०२४ च्या प्राथमिक फेरीच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीने घरच्या मैदानावर विजय मिळवला. यासह या हंगामातील संपूर्ण १४ सामने खेळणारा दिल्ली पहिला संघ ठरला, त्यांचे १४ सामन्यांत १४ गुण आहेत. त्यांनी अधिक २ गुण आपल्या खात्यात मिळवले आहेत. लखनऊ संघाने लवकर विकेट गमावले असले तरी संघाच्या इतर फलंदाजांनी कडवी झुंज दिली. निकोलस पुरन आणि अष्टपैलू खेळाडू अऱशद खानची वादळी खेळी पाहायला मिळाली.

हेही वाचा – LSG v DC: केएल राहुलचा डायव्हिंग झेल पाहून संजीव गोयंका जागेवरून उठले अन्… VIDEO मध्ये पाहा काय घडलं?


दिल्लीच्या या विजयामुळे लखनऊला प्लेऑफमध्ये पोहोचणे आता जवळपास अवघड झाले आहे. त्याचवेळी दिल्लीच्या सर्व आशा आता संपुष्टात आल्या आहेत. या मोसमातील शेवटचा साखळी सामना खेळण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स मैदानात उतरली होती. अशाप्रकारे, संघाला हंगामातील १४ सामन्यांत ७ विजय आणि ७ पराभवांसह केवळ १४ गुण मिळवता आले. दिल्ली अधिकृतपणे प्लेऑफमधून बाहेर नाही झाली, पण खराब रनरेटमुळे त्यांच्यासाठी प्लेऑफ गाठणे कठीण आहे. दिल्ली संघाच्या विजयासह राजस्थान रॉयल्स आता प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

हेही वाचा – IPL 2024: १८ धावा किंवा १८.१ षटके… आरसीबी की चेन्नई कोण गाठणार प्लेऑफ, वाचा कसं आहे समीकरण?

दिल्लीने दिलेल्या २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊने ९ बाद १८९ धावा केल्या. लखनऊच्या डावाची सुरूवात फारच खराब झाली. केएल राहुल (५), मार्कस स्टॉयनिस (५), क्विंटन डिकॉक (१२), दिपक हुडा (०) हे लखनऊचे टॉप ४ फलंदाज स्वस्तात बाद झाले. त्यानंतर निकोलस पुरनने एकट्याने संघाचा डाव सावरला, त्याने २७ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारांसह ६१ धावा करत बाद झाला. त्यानंतर आयुष बदोनी ६ धावा, क्रुणाल पंड्या १८ धावा करत बाद झाले. यानंतर लखनऊचा अष्टपैलू खेळाडू अरशद खानने ३३ चेंडूत ५ षटकार आणि ३ चौकार ५८ धावा करत शेवटपर्यंत लखनऊला सामन्यात टिकवून ठेवले. अरशद खानने त्याच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने जेक फ्रेझर मॅकगर्कलाहि पहिल्याच षटकात झेलबाद केले होते.


दिल्लीकडून सामनावीर ठरलेल्या इशांत शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर खलील अहमद, अक्षर पटेल, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्त्पूर्वी केएल राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि त्यांनी शानदार फटकेबाजी करत २०८ धावांचा डोंगर उभारला. संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज जेक फ्रेझर मॅकगर्क खातेही न उघडता लवकर बाद झाला असला तरी अभिषेक पोरेलने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकारांसह वादळी फलंदाजी करत ५८ धावा केल्या. त्यानंतर शाई होप (३८) आणि ऋषभ पंत (३३) यांनी विस्फोटक फलंदाजी केली. ट्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकारांसह ५७ धावा करत नाबाद राहिला. तर अक्षर पटेलने १४ धावा केल्या. लखनऊकडून नवीन उल हकने २ विकेट्स घेतल्या तर अऱशद खान आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी १ विकेट घेतली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dc beat lsg by 19 runs abhishek porel tristan stubbs half centuries and ishant sharma 3 wickets arun jaitely stadium ipl 2024 bdg