IPL 2025 RCB vs DC Highlights in Marathi: केएल राहुलचा विजयी षटकार आणि दिल्लीने आरसीबीचा ६ विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीने कमालीच्या गोलंदाजीवर सामना आपल्या बाजूने वळवला होता, पण केएल राहुल आपल्या खेळीच्या जोरावर संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. राहुल या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी आला होता. राहुलने ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटतकारांसह ९३ धावा करत नाबाद परतला. तर ट्रिस्टन स्टब्सने त्याला ३८ धावा करत चांगली साथ दिली.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा केल्या होत्या. तर दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. केएल राहुलच्या खेळीसह दिल्लीने १७.५ षटकांत १६९ धावा करत ६ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. यासह दिल्लीने आयपीएलमधील एकाही सामन्यात पराभूत न होता सलग चौथा सामना जिंकला आहे.
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना १६३ धावा केल्या होत्या. तर दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचं लक्ष्य दिलं होतं. केएल राहुलच्या खेळीसह दिल्लीने १७.५ षटकांत १६९ धावा करत ६ विकेट्सने मोठा विजय नोंदवला. यासह दिल्लीने आयपीएलमधील एकाही सामन्यात पराभूत न होता सलग चौथा सामना जिंकला आहे.
१६४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खूपच खराब झाली. फाफ डू प्लेसिसला यश दयालने फक्त २ धावांवर बाद केले. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांना स्वस्तात बाद केले. फ्रेझरने ६ चेंडूत ७ धावा केल्या. अभिषेक पोरेललाही फक्त ७ धावा करता आल्या. कर्णधार अक्षर पटेलही मोठी खेळी करू शकला नाही.
३० धावांवर ३ विकेट गमावल्यानंतर अडचणीत सापडलेल्या दिल्लीला केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी उत्तम प्रकारे सावरलं. विशेषतः राहुलने मोक्याच्या क्षणी चांगली फलंदाजी केली आणि दिल्लीला पराभवातून बाहेर काढत चांगली फलंदाजी केली. क्रीजवर सेट झाल्यानंतर राहुलने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. राहुलने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलने ५३ चेंडूत ९३ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान, राहुलने ७ चौकार आणि ६ षटकार मारले. स्टब्सने २३ चेंडूत नाबाद ३८ धावा केल्या. राहुलने एक शक्तिशाली षटकार मारत दिल्लीला या हंगामात सलग चौथा विजय मिळवून दिला.
आरसीबीने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. आऱसीबीची सुरूवात एकदम दणक्यात झाली पण संघ मोठी धावसंख्या रचू शकला नाही. फिल सॉल्ट आणि विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी ३.५ षटकांत ६१ धावांची भागीदारी केली. सॉल्टने स्फोटक फलंदाजी करत १७ चेंडूत ३७ धावा केल्या. स्टार्कच्या एकाच षटकात सॉल्टने ३० धावा फटकावल्या, ज्याच्या मदतीने आरसीबीने फक्त ३ षटकात ५० धावा केल्या. त्याच वेळी, किंग कोहलीने १४ चेंडूत २२ धावा केल्या. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ठराविक अंतराने विकेट गमावल्या आणि निम्मा संघ १०० धावांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच बाद झाला.
रजत पाटीदारने २३ चेंडूत २५ धावा केल्या. यानंतर शेवटच्या षटकांमध्ये, टिम डेव्हिडने जबाबदारी घेतली आणि वादळी फलंदाजी करत २० चेंडूत ३७ धावा केल्या, ज्यामुळे आरसीबी २० षटकांत ७ गडी गमावून १६३ धावा करू शकला. गोलंदाजीत, कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये एक शानदार स्पेल टाकला आणि फक्त १७ धावा देऊन दोन विकेट घेतल्या. त्याच वेळी, मोहित शर्माने १० धावा देऊन एक विकेट घेतली.