DC team will wear a new rainbow colored jersey: आयपीएलचा १६ वा हंगाम दिल्ली कॅपिटल्ससाठी अजिबात चांगला नव्हता. या हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा दिल्ली हा पहिला संघ ठरला. आता संघ विजयासह हंगामाचा शेवट करण्याचा प्रयत्न करेल. दिल्लीला आता त्यांचा शेवटचा साखळी सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर खेळायचा आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर २० मे रोजी होणार आहे. चेन्नईला प्लेऑफमधील आपले स्थान पूर्णपणे पक्के करण्यासाठी शेवटचा साखळी सामना जिंकणे आवश्यक आहे. या सामन्यापूर्वी दिल्ली संघाने एक मोठी घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स एका वेगळ्या अवतारात मैदानात उतरताना दिसतील. कारण दिल्ली कॅपिटल्स संघाने शेवटच्या सामन्यात आपली जर्सी बदलण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२ च्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स प्रथमच इंद्रधनुष्याच्या रंगातील जर्सीमध्ये खेळलील होती. यानंतर दिल्ली संघ ही जर्सी घालून प्रत्येक मोसमात एक सामना खेळतो.

आतापर्यंत इंद्रधनुष्याच्या रंगातील जर्सीमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विक्रम एकतर्फी पाहिला गेला आहे. २०२२ मध्ये जेव्हा संघ पहिल्यांदा ही जर्सी घालून मैदानात उतरला ,तेव्हा त्यांनी आरसीबीविरुद्ध ५९ धावांनी विजय मिळवला होता. तसेच २०२१ च्या मोसमात या जर्सीत संघाने मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना ४ गडी राखून जिंकला होता. गेल्या मोसमात दिल्लीने ही जर्सी परिधान करून मोसमातील पहिला सामना खेळला आणि केकेआरविरुद्ध ४ गडी राखून विजय मिळवला.

हेही वाचा – SRH vs RCB: “आज कोहलीने १०० धावा करून इतके नाटक केले, जसे…”, विराटच्या शतकानंतरच्या सेलिब्रेशनवर केआरकेची टीका

पराभव झाल्यास चेन्नई इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून –

चेन्नई सुपर किंग्ज या मोसमात दुसऱ्यांदा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. यापूर्वी दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा चेन्नईने २७ धावांनी सामना जिंकला होता. मात्र, या सामन्यात सीएसकेचा पराभव झाला तर त्यांना इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे प्लेऑफच्या दृष्टीने चेन्नईसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे.