Delhi Capitals vs Chennai Super Kings Score Today, 20 May 2023: आयपीएलच्या ६७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. प्लेऑफमध्ये आपले तिकीट निश्चित करण्यासाठी चेन्नईला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. गेल्या सामन्यात त्यांना कोलकात्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवेच्या शानदार सलामी भागीदारीच्या जोरावर दिल्ली या सामन्यात खूप मागे पडली आहे. शनिवारच्या पहिल्या डबल हेडर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर २२४ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चेन्नईने धमाकेदार सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी पहिल्या विकेटसाठी ८५ चेंडूत १४१ धावांची भागीदारी केली. ५० चेंडूत ७९ धावांची खेळी केल्यानंतर गायकवाड बाद झाला. त्याला चेतन साकारियाने रिले रुसोकरवी झेलबाद केले. कॉनवेने दुबेसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. शिवम दुबे २२ धावा करून खलील अहमदचा बळी ठरला. पाठोपाठ चेन्नईला आणखी एक मोठा धक्का बसला, डेव्हॉन कॉनवे ५२ चेंडूत ८७ धावांची खेळी केल्यानंतर ऑनरिक नॉर्खियाकरवी बाद झाला.
चेन्नईकडून सलामीवीर मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडने ७९ आणि डेव्हन कॉनवेने ८७ धावा केल्या. अखेरीस शिवम दुबे २२ आणि रवींद्र जडेजाने २० धावांची आक्रमक फटके मारत जलद खेळी खेळली. दिल्लीकडून खलील अहमद, ऑनरिक नॉर्खिया आणि चेतन साकारिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दिल्ली संघाला २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होणार आहे. आजपर्यंतच्या इतिहासात दिल्लीने कधीही ही धावसंख्या यशस्वीरित्या पाठलाग करत विजयी झाली आहे.
चेन्नईचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अद्याप या संघाचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झालेले नाही. चेन्नईने १३ पैकी ७ सामने जिंकले असून एक सामना पावसाने व्यत्यय आणला होता. चेन्नईच्या खात्यात १५ गुण आहेत. हा सामना जिंकून चेन्नई १७ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचेल. त्याच वेळी, हरल्यावर, हा संघ लखनऊ, आरसीबी आणि मुंबईच्या पराभवासाठी प्रार्थना करेल.
दोन्ही संघातील ११ खेळत आहे
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षना.
इम्पॅक्ट खेळाडू: मथिशा पाथिराना, मिचेल सॅन्टनर, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग.
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिले रुसो, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, एनरिच नॉर्टजे.
इम्पॅक्ट खेळाडू: पृथ्वी शॉ, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिपल पटेल, अभिषेक पोरेल.