Delhi Capitals vs Chennai Super Kings Score Today, 20 May 2023: आयपीएलच्या ६७व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी संपन्न झाला. प्लेऑफमध्ये आपले तिकीट निश्चित करण्यासाठी चेन्नईला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागणार होता आणि थालाने आपल्या संघाला मार्गदर्शन करत चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोचवले. धोनीच्या जादूपुढे दिल्ली कॅपिटल्स अपयशी ठरली. चेन्नई सुपर किंग्सने तब्बल ७७ धावांनी शानदार विजय मिळवत प्ले ऑफमध्ये दिमाखात एन्ट्री केली.

गेल्या सामन्यात त्यांना कोलकात्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ऋतुराज गायकवाड आणि डेव्हिड कॉनवेच्या शानदार सलामी भागीदारीच्या जोरावर दिल्ली या सामन्यात खूप मागे पडली होती आणि तिथेच चेन्नई सामना जिंकणार असे वाटत होते. परंतु नेहमीप्रमाणे दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एकहाती झुंज देत ५८ चेंडूत ८६ धावा करून बाद झाला. मथिशा पाथीरानाने त्याला ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केले. वॉर्नरने आपल्या खेळीत सात चौकार आणि पाच षटकार मारले. शनिवारच्या पहिल्या डबल हेडर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कॅपिटल्ससमोर २२४ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते आणि पाठलाग करताना २० षटकात दिल्लीने ९ बाद १४६ धावा केल्या.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?

चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा ७७ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई संघाने तीन विकेट गमावत २२३ धावा केल्या होत्या. डेव्हॉन कॉनवेने ८७ आणि ऋतुराज गायकवाडने ७९ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दिल्लीचा संघ केवळ १४६ धावाच करू शकला. चेन्नईकडून दीपक चहरने बॉलसह तीन बळी घेतले. मथिशा पाथिराना आणि महेश तिक्ष्णाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कर्णधार वॉर्नरने ८६ धावा केल्या. या विजयासह चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरला आहे. चेन्नईचे लीग टप्प्यात १७ गुण झाले आहेत.

आता हा संघ दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफमधील पुढील सामना खेळेल. आता चेन्नईचे खेळाडू लखनऊचा शेवटचा सामना हरावा अशी प्रार्थना करतील. या स्थितीत चेन्नई दुसऱ्या स्थानावर राहून पहिला क्वालिफायर खेळणार असून या संघाला अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी मिळतील. याच पार्श्वभूमीवर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांनी सीएसकेला जोरदार सुरुवात मिळवून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांमध्ये १४१ धावांची भागीदारी केली. या दोघांनी आयपीएल इतिहासात १००० धावांची भागीदारीही पूर्ण केली. १००० धावा करण्यासाठी ऋतुराज आणि गायकवाड या सलामीवीर जोडीला आयपीएलमध्ये २० डावांमध्ये खेळाव्या लागल्या.

हेही वाचा: MS Dhoni IPL 2023:  चाहता असावा तर असा! “उभ्या आयुष्यात मला कोणी असे गिफ्ट…” जबरा फॅनमुळं धोनी झाला भावनिक

दोन्ही संघातील ११ खेळडू

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तिक्षना.

इम्पॅक्ट खेळाडू: मथिशा पाथिराना, मिचेल सॅन्टनर, शुभ्रांशू सेनापती, शेख रशीद, आकाश सिंग.

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), रिले रुसो, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, एनरिच नॉर्टजे.

इम्पॅक्ट खेळाडू:  पृथ्वी शॉ, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रिपल पटेल, अभिषेक पोरेल.