Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Score Updates: आयपीएल २०२३च्या २८व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. डबल हेडर सामन्यातील दुसऱ्या सामन्यात दिल्लीने कोलकाताच्या फलंदाजांची बत्ती गुल केली. कोलकाता नाईट रायडर्सने अवघे १२७ धावा करत १२८ धावांचे आव्हान ठेवले आहे. आधीच दिल्लीचा संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे पाचही सामने त्यांनी गमावले आहेत. त्याचबरोबर कोलकाता संघाने पाचपैकी दोन सामने जिंकले असून तीनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीचा संघ अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे, आज ते विजयी होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार वॉर्नरने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. अभिषेक पोरेलच्या जागी इशांत शर्माचे पुनरागमन झाले आहे. इशांत २३ महिन्यांनंतर आयपीएलमध्ये सामना खेळताना दिसणार आहे. त्याने शेवटचा सामना २ मे २०२१ रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळला होता. त्याचवेळी मुस्तफिजुर रहमानच्या जागी यष्टिरक्षक फलंदाज फिल सॉल्ट खेळत आहे. कोलकाताचा कर्णधार नितीश राणाने प्लेइंग-११ मध्ये चार बदल केले आहेत. रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन, शार्दुल ठाकूर आणि सुयश शर्मा यांना वगळण्यात आले आहे. पावसामुळे षटके कमी करण्यात आलेले नाहीत. पावसामुळे सामना एक तास उशिरा सुरु झाला आणि त्याचेच नुकसान कोलकाताला भोगावे लागले.

Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Travis Head Statement on Mohammed Siraj Fight and Send Off Said I Said Well Bowled IND vs AUS 2nd Test
Travis Head on Siraj Fight: “मी म्हणालो चांगला चेंडू होता पण त्याने…”, सिराज आणि हेडमध्ये नेमका कशावरून झाला वाद? ट्रॅव्हिस हेडने सामन्यानंतर सांगितलं
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण

कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघ २० षटकांत १२७ धावांवर गारद झाला. कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने सुरुवातीपासूनच नियमित अंतराने विकेट गमावल्या. लिटन दास चार, कर्णधार नितीश राणा चार, मनदीप सिंग १२ धावा, रिंकू सिंग सहा धावा आणि सुनील नरेन चार धावा करून बाद झाले. व्यंकटेश अय्यर आणि अनुकुल रॉय यांना खातेही उघडता आले नाही.

एकवेळ कोलकाताने ९६ धावांत नऊ विकेट गमावल्या होत्या. या ९६ पैकी ४३ धावा जेसन रॉयच्या होत्या. जेसनने ३९ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली. कुलदीपची हॅटट्रिक हुकली. त्याने १५व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूत दोन बळी घेतले. जेसनला अमन खानने झेलबाद केल्यानंतर कुलदीपने प्रभावशाली खेळाडू अनुकुल रॉयला एलबीडब्ल्यू आऊट केले. उमेश यादव तीन धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात आंद्रेस रसेलने मुकेश कुमारला लागोपाठ तीन चेंडूत तीन षटकार ठोकले. यातील एक षटकार १०९मीटरचा होता. वरुण चक्रवर्ती (१) शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. रसेलने ३१ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ३८ धावा केल्या.

हेही वाचा: Sachin Tendulkar @50: सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजाची चुटकीसरशी विकेट घेत होता, तब्बल आठ वेळा बाद होणारा फलंदाज कोण?

२३ महिन्यांनंतर आयपीएलमध्ये सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने शानदार पुनरागमन केले. त्याने चार षटकात १९ धावा देत दोन बळी घेतले. याशिवाय एनरिक नॉर्ट्झ, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतले मुकेश कुमारने एक विकेट घेत त्यांना साथ दिली.

Story img Loader