IPL 2025 DC vs KKR Highlights: केकेआरने प्लेऑफ दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह केकेआरने स्पर्धेत स्वत:ला कायम ठेवलं आहे. तर दिल्लीच्या संघाने घरच्या मैदानावर सलग दुसरा सामना गमावला आहे. दिल्लीसाठी हा पराभव गुणतालिकेत त्यांना थोडा धक्का देणारा ठरलाय. संघाचे पुढचे तिन्ही सामने प्लेऑफच्या शर्यतीतील संघांबरोबर असणार आहेत.

Live Updates

IPL 2025 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Highlights: आयपीएल २०२५ दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स हायलाईट्स

23:23 (IST) 29 Apr 2025
DC vs KKR LIVE: केकेआरचा विजय

केकेआरने दिल्लीवर १४ धावांनी विजय मिळवला आहे. करो या मरो सामन्यातील केकेआरसाठी हा विजय प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा होता आणि संघाने अखेरीस विजय मिळवला. केकेआरने दिल्लीला विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य दिले होते. पण केकेआरचा संघ २० षटकांत १९० धावाच करू शकला. फाफ डू प्लेसिस ६२ धावा तर अक्षर पटेलने ४३ धावांची खेळी केली. विपराज निगमने १९ चेंडूत ३८ धावांची झटपट खेळी केली. पण संघ विजय मात्र मिळवू शकला नाही. यासह केकेआरने विजयासह प्लेऑफ गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

23:13 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: वरूण चक्रवर्तीच्या फिरकीची जादू

वरूण चक्रवर्तीच्या १८व्या षटकात त्याने सलग २ चेंडूवर २ विकेट घेत दिल्लीला मोठा धक्का दिला आहे. दुसऱ्या चेंडूवर विस्फोटक फलंदाज आशुतोष शर्माला झेलबाद केलं. तर तिसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कला झेलबाद केलं. यासह आता १८ षटकांनंतर दिल्लीला विजयासाठी १२ चेंडूत ३८ धावांची गरज आहे.

22:58 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: फाफ डू प्लेसिस झेलबाद

१६व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर सुनील नरेनने फाफ डू प्लेसिसला झेलबाद करवत संघासाठी मोठी विकेट मिळवून दिली आहे. दिल्ली कॅपिटल्सला २८ चेंडूत ५९ धावांची गरज आहे.

22:55 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: सुनील नरेनच्या एका षटकात २ विकेट

१४व्या षटकात सुनील नरेनने आधी अक्षर पटेलला झेलबाद केलं, यानंतर अखेरच्या चेंडूवर त्याने नुकत्याच आलेल्या ट्रिस्टन स्टब्सला क्लीन बोल्ड करत केकेआरला सामन्यात कायम ठेवलं.

22:48 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: अजिंक्य रहाणेला दुखापत

अजिंक्य रहाणेला फिल्डिंग करताना चेंडू उडवताना दुखापत झाली. अजिंक्य दुखापतीमुळे मैदानाबाहेर झाला आहे. त्याच्या हातातून रक्तही येत आहे. तर अक्षर पटेललाही सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. पण तरीही तो फलंदाजीला उतरला.

22:29 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR Live: फाफ डू प्लेसिसचं अर्धशतक

फाफ डू प्लेसिसने केकेआरविरूद्ध सामन्यात ६ चौकार आणि २ षटकारांसह ३१ चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे.

22:16 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR Live: केएल राहुल धावबाद

अनुकूल सातवं षटक टाकण्यासाठी आला, त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेताना चुकीच्या कॉलमुळे राहुल धावबाद झाला, नरेनचा परफेक्ट थ्रो जो स्टंप्सवर जाऊन आदळला. दिल्लीसाठी हा मोठा धक्का आहे.

22:13 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR Live: पॉवरप्ले

पॉवरप्लेमध्ये दिल्लीने २ विकेट्स गमावले असले तरी ३ बाद ५८ धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिस २८ धावा आणि राहुल ६ धावा करत खेळत आहेत.

22:02 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR Live: दिल्लीचं टेन्शन वाढलं; करूण नायर तंबूत परतला

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज करूण नायर बाद होऊन माघारी परतला आहे.

21:41 (IST) 29 Apr 2025
DC vs KKR Live: पहिल्याच षटकात दिल्लीला धक्का

अभिषेक पॉरेल पहिल्याच षटकात बाद होऊन माघारी परतला आहे. अनुकूल रॉयने त्याला दुसऱ्याच चेंडूवर बाद करत माघारी धाडलं आहे

21:21 (IST) 29 Apr 2025
DC vs KKR LIVE: अखेरच्या षटकात काय घडलं?

अखेरच्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजीला आला. पहिल्या चेंडूवर रसेलने षटकार लगावला. दुसऱ्या चेंडूवर वाईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आला, पण निर्णय बदलण्यात आला नाही. तिसऱ्या चेंडूवर परत दिल्लीने वाईडसाठी रिव्ह्यू घेतला पण तो संघाच्या बाजूने लागला आणि वाईड रद्द झाला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर पॉवेलने पायचीत झाल्याने रिव्ह्यू घेतला पण हा निर्णय देखील दिल्लीच्या बाजूने लागला. पाचव्या चेंडूवर रसेल धावबाद झाला. पण झेलबादसाठी स्टार्कने रिव्ह्यू घेण्यासाठी कर्णधाराला मनवलं आणि एका षटकात चौथा रिव्ह्यू घेतला गेला. शेवटी अखेरच्या चेंडूवर वरूणने एक धाव घेतली आणि संघाला २०४ धावांपर्यंत पोहोचवलं. यासह केकेआरने दिल्लीला विजयासाठी २०५ धावांचं आव्हान दिलं आहे.

20:57 (IST) 29 Apr 2025
DC vs KKR LIVE: केकेआरचा निम्मा संघ तंबूत

दुष्मंता चमीराने डावातील १७व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अंगक्रिश रघुवंशीला झेलबाद करत पहिली विकेट मिळवली. यासह केकेआरचा निम्मा संघ माघारी परतला आहे. अंगक्रिश रघुवंशी ३२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४४ धावा करत बाद झाला. पुढच्याच षटकात विपराज निमगने रिंकू सिंगला झेलबाद केलं.

20:53 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: रिंकू-रघुवंशीने सावरला डाव

झटपट ३ विकेट्स गमावल्यानंतर रिंकू सिंग आणि अंगक्रिश रघुवंशीने संघाचा डाव सावरला. हे दोन्ही खेळाडू अर्धशतकी भागीदारी करत मैदानावर कायम आहेत. त्यांनी १६ षटकांत ३ बाद १६८ धावांची भागीदारी केली आहे.

20:26 (IST) 29 Apr 2025
DC vs KKR LIVE: चौथा धक्का

१०व्या षटकातील अक्षर पटेलच्या दुसऱ्या चेंडूवर वेंकटेश अय्यर ७ धावा करत झेलबद झाला. वेंकटेश अय्यरने पुन्हा एकदा निराश केलं आहे. यासह १० षटकांत केकेआरने ४ बाद ११७ धावा केल्या आहेत.

20:24 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: दोन षटकात २ विकेट

पॉवरप्लेनंतर सातव्या षटकात विपराज निगमने सुनील नरेनला पायचीत केलं. नरेन १६ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २७ धावा करत बाद झाला. तर आठव्या षटकात अक्षर पटेलने येताच दुसऱ्या चेंडूवर अजिंक्य रहाणेला पायचीत करत झेलबाद झाला. रहाणे १४ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह २६ धावा करत बाद झाला.

20:11 (IST) 29 Apr 2025
DC vs KKR LIVE: केकेआरची वादळी सुरूवात

केकेआरच्या करो या मरो सामन्यात चांगली सुरूवात केली आहे. पॉवरप्लेमध्ये दिल्लीच्या गोलंदाजांची फटकेबाजी करत १ बाद ७९ धावा केल्या आहेत. रहाणे १० चेंडूत २४ धावा तर नरेन १४ चेंडूत २६ धावा करत खेळत आहे.

19:51 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: वादळी फटकेबाजी

रहमानुल्ला गुरबाज आणि सुनील नरेन यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकात वादळी फटकेबाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. चमीराच्या दुसऱ्या षटकात चौकार-षटकारांसह २५ धावा कुटल्या. तर तिसऱ्या षटकात १५ धावा कुटल्या, पण गुरबाजच्या रूपात संघाला एक धक्काही बसला. स्टार्कच्या गोलंदाजीवर गुरबाज झेलबाद झाला.

19:37 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: चौकाराने सुरूवात

केकेआरचा संघ प्रथम फलंदाजीला उतरला असून रहमनुल्ला गुरबाज आणि सुनील नरेन सलामीला उतरले आहेत. गुरबाजने पहिल्यात षटकात पहिल्या चेंडूवर चौकार आणि अखेरच्या चेंडूवर चौकार लगावला आहे.

19:07 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: केकेआरची प्लेईंग इलेव्हन

रहमानउल्ला गुरबाज(विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे(कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, हर्षित राणा, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती

19:06 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन

फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णदार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, दुष्मंथा चमीरा, मुकेश कुमार

19:02 (IST) 29 Apr 2025
DC vs KKR LIVE: नाणेफेक

दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स सामन्याची नाणेफेक झाली असून संघाने दिल्लीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर केकेआरचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. केकेआरच्या ताफ्यात एक मोठा बदल झाला आहे. फिरकीपटू अनुकूल रॉय प्लेईंग इलेव्हन सामील झाला आहे. तर दिल्लीचा संघ सारख्याच प्लेईंग इलेव्हनसह उतरेल.

18:47 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: केकेआरचा संपूर्ण संघ

अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसेल, हर्षित राणा, रमणदीप सिंग, व्यंकटेश अय्यर, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, एनरिक नोरखिया, अंगक्रिश रघुवंशी, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, स्पेन्सर जॉन्सन, लाव्हेन्सी, लवनिथ सिसोदिया, अनुकुल रॉय, मोईन अली, चेतन सकारिया

18:47 (IST) 29 Apr 2025

DC vs KKR LIVE: दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ

अक्षर पटेल (कर्णधार), करुण नायर, हॅरी ब्रूक, जॅक फ्रेझर मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, डोनोव्हन फेरेरिया, केएल राहुल, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, दर्शन नळकांडे, अजय मंडल, विपराज निगम, मनवंत कुमार, त्रिपुराण विजय, माधव तिवारी, दुष्मंथ चमेरा, मोहित शर्मा, टी. नटराजन, मुकेश कुमार, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव

IPL 2025 DC vs KKR Highlights: केकेआरने करो या मरो सामन्यात दिल्लीचा पराभव करत आपल्या प्लेऑफच्या आशा कायम ठेवल्या आहेत.