आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील कोलकाता आणि दिल्ली कॅपिट्लस यांच्यातील सामन्याला चांगलीच रंगत चढलीय. या सामन्यात अगोदर फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने तुफान फटकेबाजी करत केकेआरच्या गोलंदाजांना घाम फोडला. सलामीला आलेल्या देविड वॉर्नरने तर चौकार आणि षटकार लगावत या हंगामातील पहिले अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे या सामन्यात डेविड वॉर्नरने मोठा विक्रम नोंदवला असून आयपीएलच्या इतिहासात तो सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठऱला आहे. त्याच्या या खेळीमुळेच दिल्लीला २१५ धावांपर्यंत मजल मारता आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> IPL 2022 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : हैदराबादचा चेन्नईला शह ; हंगामातील पहिल्या विजयात अभिषेक चमकला

नाणएफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिट्लसकडून डेव्डिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ सलामीला आले. मैदानात आल्यापासूनच या जोडीने मोठी फटकेबाजी करत आपला जम बसवला. दोघांनही नऊ षटकांमध्ये ९३ धावांची भागिदारी केली. त्यानतर नवव्या षटकात पृथ्वी शॉ अर्धशतकी खेळी करत ५१ धावांवर बाद झाला. त्याने २९ चेंडूंमध्ये सात चौकार आणि दोन षटकार यांच्या मदतीने ५१ धावा केल्या. त्यानंतर ऋषभ पंत, ललित यादव, रोवमन पॉवेल हे फलंदाज बाद होत गेले. मात्र एकटा डेविड वॉर्नर केकेआरच्या गोलंदाजांशी दोन हात करत होता.

हेही वाचा >>> IPL 2022 : बंगळुरुचा दिग्गज खेळाडू आयपीएलमधून पडला बाहेर, तातडीने गाठलं घर, नेमकं कारण काय ?

डेविड वॉर्नरने संयम राखत वेळ मिळेत तिथे मोठे फटके लगावले. मात्र १७ व्या षटकामध्ये उमेश यादवने टाकलेल्या चेंडूवर फटका मारताना अजिंक्य रहाणेने त्याचा झेल टिपला. त्याने ४५ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारच्या मदतीने ६१ धावा केल्या. वॉर्नरचे या हंगामातील हे पहिले अर्धशतक आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणारा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. त्याचे आयपीएलमधील हे ५५ वे अर्धशतक होते.

हेही वाचा >>> चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यामुळे विराट संतापला, आरसीबीने तर सांगितला थेट नियम, MI vs RCB सामन्यात पंचाची पुन्हा चूक?

दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने केकेआरसमोर २१५ धावांचा डोंगर उभा केला आहे. कोलकाता संघ ही धावसंख्या गाठू शकणार का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dc vs kkr match david warner first fifty in ipl 2022 prd