DC vs KKR Match Updates : आयपीएल २०२४ मधील १६ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमनेसामने आहेत. राजशेखर रेड्डी एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआरच्या फलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत ७ बाद २७२ धावांचा डोंगर उभारत आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. तसेच दिल्लीला २७३ धावांचे लक्ष्य दिले आहे. केकेआरकडून सलामीवीर सुनील नरेनने सर्वाधिक ८५ धावांची खेळी साकारली.

केकेआरने रचला इतिहास –

कोलकाता नाईट रायडर्सने विशाखापट्टणममध्ये मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यांनी २० षटकांत सात गडी गमावून २७२ धावा केल्या आहेत. दिल्लीसमोर २७३ धावांचे मोठे लक्ष्य आहे. ही आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. या मोसमात आयपीएलची सर्वात मोठी धावसंख्याही झाली. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध (२७ मार्च) २७७ धावा केल्या होत्या. त्याच वेळी, एकूण टी-२० मध्ये ही आठव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. २७१ धावा ही कोलकात्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१८ मध्ये त्याने पंजाबविरुद्ध सहा विकेट्सवर २४५ धावा केल्या होत्या.

IND vs AUS Pitch Invader At The MCG Tried to Hug Virat Kohli and Dances on Ground in Melbourne Test Watch Video
IND vs AUS: विराटच्या खांद्यावर ठेवला हात अन् मग केला डान्स, मेलबर्न कसोटीत अचानक मैदानात घुसला चाहता; VIDEO होतोय व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
PAK vs SA Corbin Bosch takes wicket on first ball of Test career to create new record
PAK vs SA: पदार्पणाच्या कसोटीत आफ्रिकेच्या खेळाडूने पहिल्याच चेंडूवर केला मोठा विक्रम, १३५ वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं काही
Jasprit Bumrah Bowled Out Travis Head on Duck and Breaks Anil Kumble Record of Most Wickets At MCG IND vs AUS
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा तारणहार हेड असा झाला त्रिफळाचीत; जसप्रीत बुमराहने नावावर केला अनोखा विक्रम, पाहा VIDEO
IND vs AUS Ricky Ponting statement on Virat Kohli and Sam Konstas argument at MCG
IND vs AUS : “त्याने टक्कर होण्यास…”, विराट-कॉन्स्टासच्या धक्काबुकीवर प्रकरणावर रिकी पॉन्टिंगचे मोठे वक्तव्य
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls in IND vs AUS Boxing Day Test at Melbourne match
IND vs AUS : सॅम कॉन्स्टासने जसप्रीत बुमराहविरुद्ध षटकार लगावत लावली विक्रमांची रांग! पाहा संपूर्ण यादी
IND vs AUS Boxing Day Test Sam Konstas hit six against Jasprit Bumrah after 4483 balls
IND vs AUS : १९ वर्षीय खेळाडूने जसप्रीत बुमराहविरुद्ध केला मोठा पराक्रम, ११४५ दिवसांनी मोडला खास विक्रम

प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या कोलकाताला पहिला धक्का पाचव्या षटकात ६० धावांवर बसला. एनरिक नॉर्टजेने फिल सॉल्टला (१८) ट्रिस्टन स्टब्सकरवी झेलबाद केले. आधीच्या चेंडूवर वॉर्नरने सॉल्टचा झेल सोडला होता. यानंतर सुनील नरेने अंगकृश रघुवंशी साथीने केकेआर संघाचा डाव सावरला. या दोघांनी दमदार फटकेबाजी करताना दुसऱ्या विकेट्ससाठी १०४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. यानंतर कोलकाताला १३व्या षटकात १६४ धावांवर दुसरा धक्का बसला.

हेही वाचा – DC vs KKR : केकेआरने रचला इतिहास! सुनील नरेनच्या वादळी खेळीच्या जोरावर दिल्लीसमोर ठेवले २७३ धावांचे लक्ष्य

मिचेल मार्शने सुनील नरेनला यष्टिरक्षक पंतकडे झेलबाद केले. नरेनचे शतक हुकले. तो ३९ चेंडूंत सात चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने ८५ धावा करून बाद झाला. केकेआर संघाला तिसरा धक्का १७६ धावांवर बसला. सुनील नरेननंतर अंगकृष्ण रघुवंशीही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने २७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर ११ चेंडूत १८ धावा करून बाद झाला. आंद्रे रसेलने १९ चेंडूत ४१ धावांची तर रिंकू सिंगने ८ चेंडूत २६ धावांची शानदार खेळी केली. दिल्लीतर्फे एनरिक नॉर्टजेने तीन आणि इशांत शर्माने दोन गडी बाद केले.

Story img Loader