Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Score Updates: आयपीएल २०२३च्या २८व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी संपन्न झाला. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात होता. डबल हेडर सामन्यातील दुसऱ्या सामन्यात दिल्लीने कोलकाताच्या फलंदाजांची बत्ती करत आयपीएल हंगामातील पहिला विजय नोंदवला. कोलकाता नाईट रायडर्सने अवघे १२७ धावा करत १२८ धावांचे आव्हान ठेवले आहे त्याचा पाठलाग करताना दिल्लीने चार विकेट्सने हा सामना जिंकला.

आधीच दिल्लीचा संघ अतिशय खराब फॉर्ममध्ये जात असून आतापर्यंतचे पाचही सामने त्यांनी गमावले होते. मात्र आजच्या सहाव्या सामन्यात त्यांनी शानदार कामगिरी करत संघाला रुळावर आणण्याचा प्रयत्न केला. धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सृरुवत फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर पृथ्वी शॉने ११ चेंडूत १३ धावा करत चक्रवर्तीकरवी त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आलेला अष्टपैलू मिचेल मार्श फारशी काही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने ९ चेंडूत २ धावा केल्या. मागील काही सामन्यात जशी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एक बाजू लावून धरत फलंदाजी केली होती तशीच येथे केली. त्याने ४१ चेंडूत ५७ धावा करत दमदार अर्धशतक झळकावले. मात्र चक्रवर्तीच्या फिरकी चेंडूवर पायचीत झाला. त्याने त्याच्या खेळीत ११ चौकार लगावले.

Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Mumbai Indians will buy five of their old players for IPL 2025
Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विक्रमी सहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ पाच जुन्या शिलेदारांवर लावणार बोली, जाणून घ्या कोण आहेत?
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ

मधल्या फळीतील मनीष पांडेने मोठा फटका मारण्याच्या नादात २१ (२३) बाद झाला. त्यानंतर आलेला इम्पॅक्ट खेळाडू अमान खान भोपळाही न फोडता बाद झाला. अष्टपैलू अक्षर पटेल यांनी प्रत्येकी आणि १९(२२) धावा करत संघाला विजय मिळवून दिला. कोलकाताकडून वरूण चक्रवर्ती, अनुकूल रॉय आणि कर्णधार नितीश राणा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या सामन्यात दिल्लीने रोमांचक विजय मिळवला.

हेही वाचा: Sachin Tendulkar @50: सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या दिग्गज फलंदाजाची चुटकीसरशी विकेट घेत होता, तब्बल आठ वेळा बाद होणारा फलंदाज कोण?

तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार वॉर्नरने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. पावसामुळे षटके कमी करण्यात आलेले नाहीत. पावसामुळे सामना एक तास उशिरा सुरु झाला आणि त्याचेच नुकसान कोलकाताला भोगावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर १२८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघ २० षटकांत १२७ धावांवर गारद झाला. कोलकाताची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने सुरुवातीपासूनच नियमित अंतराने विकेट गमावल्या. त्याचबरोबर कोलकाता संघाने पाचपैकी दोन सामने जिंकले असून तीनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.