IPL 2023 MI vs DC Match Updates: सलग दोन पराभवानंतर मुंबई इंडियन्सने अखेर आयपीएल २०२३ मध्ये आपले विजयाचे खाते उघडले. मंगळवारी अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने शेवटच्या चेंडूवर दिल्ली कॅपिटल्सचा ६ गडी राखून पराभव केला. मुंबईला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य मिळाले होते, ते त्यांनी ४ गडी गमावून पूर्ण केले. या विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतरच्या सादरीकरणात आपले मनोगत व्यक्त केले.

सामना जिंकणे सर्वात महत्वाचे –

रोहित शर्मा म्हणाला, “सामना जिंकणे सर्वात महत्वाचे आहे. आम्ही पहिल्या सामन्यापासून कठोर परिश्रम घेत आहोत. मुंबईत आमचे एक शिबिर होते, निकाल (आमच्या बाजूने) मिळाल्याने बरे वाटले. पहिला विजय नेहमीच खास असतो.” रोहित शर्माला त्याच्या ४५ चेंडूत ६५ धावांच्या खेळीबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

Virat Kohli chanted om namah shivay Gautam Gambhir listened Hanuman Chalisa
कोहलीने कोणत्या सीरिजमध्ये प्रत्येक चेंडूपूर्वी ओम नम: शिवाय म्हटलं? गंभीरसाठी हनुमान चालिसा कशी ठरली किमयागार?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Virat Kohli Jersey Flaunts by Fan During Babar Azam Match in Pakistan Champions Cup video
Video: पाकिस्तानमध्ये विराटची जबरदस्त क्रेझ, बाबर आझमच्या सामन्यात चाहत्याने दाखवली किंग कोहलीची जर्सी
Virat Kohli Breaks Wall of Chepauk Dressing Room During Practice Session In Chennai
Virat Kohli: कोहलीचा विषय लय हार्डय! विराट कोहलीच्या एका शॉटने भिंतीला पाडलं भगदाड, VIDEO व्हायरल
Duleep Trophy 2024 Akashdeep Statement on Mohammed Shami Gives Credit to His Advice After Taking 9 Wickets Haul
Duleep Trophy 2024: आकाशदीपला मोहम्मद शमीने दिला होता गुरूमंत्र, दुलीप ट्रॉफीतील सामन्यात ९ विकेट्स घेतल्यानंतर केला खुलासा
DPL 2024 Final East Delhi Champion
DPL 2024 Final : ईस्ट दिल्ली रायडर्सने पटकावले पहिले जेतेपद, मयंक रावत ठरला विजयाचा शिल्पकार
PAK vs BAN Test Series Yasir Arafat on PCB
PAK vs BAN : पीसीबी म्हणजे एक सर्कस, त्यात अनेक जोकर भरलेत; माजी खेळाडूची कठोर शब्दात टीका
Priyansh Arya hitting six consecutive sixes in an over
DPL 2024 : ६,६,६,६,६,६…भारताच्या ‘या’ फलंदाजाने केला युवराजसारखा पराक्रम, विक्रमी शतकासह धावसंख्येचाही विक्रम

आम्ही येथे कसोटी सामना खेळलो –

पियुष चावलाने तीन विकेट घेतल्या आणि चौथ्या षटकात फिरकीपटू रितिक शोकीनची ओळख करून देणाऱ्या रोहितने आपल्या कामाचे श्रेय संथ गोलंदाजांना दिले. रोहित म्हणाला, “आम्ही येथे कसोटी सामना खेळलो, खेळपट्टी वेगळी दिसत होती. या खेळपट्टीवर संथ गोलंदाज आणने महत्त्वाचे होते. फिरकीपटूंनी आम्हाला खेळात ठेवले.” भारतीय कर्णधार म्हणाला की, एक फलंदाजी एकक म्हणून त्याच्या संघाला पॉवरप्लेचा अधिकाधिक फायदा करून घ्यायचा आहे.

हेही वाचा – Rohit Ritika Video Call: मॅच विनिंग खेळी साकारल्यानंतर रोहितने मैदानावरुनच पत्नीला केला व्हिडिओ कॉल; पाहा काय म्हणाला?

चांगली भागीदारी करणे महत्त्वाचे होते –

कर्णधार रोहित म्हणाला, “एकूण धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आम्हाला चांगली फलंदाजी करायची होती. मला वाटले की सर्वांनी हात वर केले. त्यामुळे मला पॉवरप्लेचा उपयोग करण्याची गरज होती, मला माहित होते की आम्हाला आक्रमण करत राहावे लागेल आणि संधींचा फायदा घ्यावा लागेल.” तो पुढे म्हणाला, “मी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला, तिलकाशी चांगला संवाद झाला. आमच्यासाठी चांगली भागीदारी करणे महत्त्वाचे होते.”

हेही वाचा – CSK Ban Demand: धक्कादायक! तमिळनाडू विधानसभेत चेन्नई सुपर किंग्जवर बंदी घालण्याची मागणी, जाणून घ्या काय आहे कारण?

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने सर्व १० गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईने शेवटच्या चेंडूवर चार गडी गमावून विजय मिळवला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ६५ धावा केल्या. तिलक वर्माने ४१ आणि ईशान किशनने ३१ धावा केल्या. दिल्लीकडून मुकेश कुमारने दोन आणि मुस्तफिजुर रहमानने एक विकेट घेतली. दिल्लीसाठी, त्यांचा हा सलग चौथा पराभव होता. २०१३ मध्ये सलग सहा पराभवानंतर हंगामातील त्यांची दुसरी सर्वात वाईट सुरुवात आहे.