Delhi Capitals vs Mumbai Indians Live Score Update: आयपीएल २०२३ च्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघ मुंबई इंडियन्ससमोर आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. दिल्लीचा निम्मा संघ १०० धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतला. ४ षटकांत २२ धावांत ३ बळी घेणाऱ्या पियुष चावलाने दिल्ली कॅपिटल्सचे कंबरडे मोडण्याचे काम केले. पियुष चावलाने मनीष पांडे, रोवमन पॉवेल आणि ललित यादव यांची विकेट घेतली.

पियुष चावलाने दिल्लीला सुरुवातीलाच दिले धक्के –

पॉवरप्ले संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने पियुष चावलाला गोलंदाजीसाठी आणले. त्यावेळी दिल्लीचा धावसंख्या ५१/१ होती. मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर ही जोडी क्रीझवर आली होती. ९व्या षटकात मनीष पांडेला बाद करून ही जोडी फोडण्याचे काम पियुष चावलाने केले. मनीष पांडे १८ चेंडूत २६ धावांची खेळी करून बाद झाला. मनीष पांडेनंतर पॉवेल आणि ललित यादव यांना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवण्याचे काम पियुष चावलाने केले. चावलाने आपल्या स्पेलमध्ये ५.५०च्या इकॉनॉमीसह धावा दिल्या.

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
shashank shende reacted on marathi industry recent situation
मराठी चित्रपटसृष्टी ऑक्सिजनवर, वर्षभरात एकही चित्रपट चालला नाही; शशांक शेंडे यांचं स्पष्ट मत; म्हणाले, “साऊथ सिनेमांबरोबर तुलना…”
Bhaiyyaji Joshi of RSS said India should become super nation not superpower
भारत सुपरपाॅवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन
Pakistani Cricketer Called Indian Players Kafirs Mohinder Amarnath Recounts 1978 Tour of Pakistan in His Memoir
भारतीय खेळाडू ‘काफिर’; पाकिस्तानी खेळाडूची टीम इंडियावर आगपाखड, भारताच्या माजी खेळाडूने सांगितला ‘तो’ प्रसंग
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”

रवी शास्त्रींनी पियुष चावलाचे केले कौतुक –

पियुष चावला गेल्या हंगामात आयपीएलचा भाग नव्हता. मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही, तर मिनी लिलावात मुंबईने त्याला ५० लाख रुपयांना विकत घेतले. पियुष चावलाच्या गोलंदाजीने प्रभावित होऊन माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कॉमेंट्री बॉक्समधून त्याचे कौतुक केले.

हेही वाचा – Yash Dhull IPL 2023 Debut: आजोबांच्या पेन्शनमधून बनला क्रिकेटर! दिल्लीकडून पदार्पण करणारा यश धुल कोण आहे?

रवी शास्त्री म्हणाले की, “हा खेळाडू गेल्या मोसमात आमच्यासोबत बसून कॉमेंट्री करत होता, पण आता बघा तो मैदान गाजवत आहे.” रवी शास्त्री असेही म्हणाले की, ”भारतात फक्त दोनच पीसी आहेत… एक प्रियांका चोप्रा आणि दुसरा पियुष चावला ज्यांचा दबदबा आहे.” तर दुसरीकडे जतीन सप्रू यांनी पीयूषचे कौतुक करताना सांगितले की, ”आपण पीसीकडून लॅपटॉपवर आलो आहोत, पण अजूनही पीसीचा जलवा कायम आहे.”

दिल्लीने मुंबईला १७३ धावांचे लक्ष्य दिले –

दिल्ली कॅपिटल्सने मुंबईला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य दिले होते. अक्षर पटेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघासाठी चमकदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली. अक्षरने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मुंबईकडून पियुष चावला आणि बेहरेनडॉर्फने ३-३ बळी घेतले. हृतिक शोकीनला यश मिळाले.

Story img Loader