IPL2023 Delhi Capitals vs Mumbai Indians Match Updates: आयपीएल २०२३ मधील १६ वा सामना मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने शेवटच्या चेंडूवर ६ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सने १६व्या हंगामातील आपला पहिला विजय नोंदवला. तसेच दिल्ली कॅपिटल्सने सलग चौथा सामना गमावला. मुंबईने विजयाचे खाते उघडले असले, तरी सूर्यकुमार यादवची अपयशाची मालिका खंडीत झालेली नाही.

दरम्यान तिलक वर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला होता. त्याच्याकडून आज पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा खाते न उघडताच बाद झाला आहे. तो गोल्डन डकवर बाद झाला. त्याला मुकेश कुमारने कुलदीप यादवकरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादव मागील काही दिवसापासून खराब फॉर्मशी झगडताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाल होता. तेव्हापासून त्याला सूर गवसलेला नाही.

तीन सामन्यांत फक्त १६धावा, २६ दिवसांत चौथ्यांदा गोल्डन डक –

सूर्याला तीन सामन्यांत केवळ १६धावा करता आल्या आहेत. सुपर किंग्जविरुद्ध केवळ 1 धावा करून तो बाद झाला. याआधी आरसीबीविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला केवळ १५ धावा करता आल्या होत्या. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत तो सलग तीनवेळा गोल्डन डकवर बाद झाला होता. २६दिवसांत सूर्यकुमारचे हे चौथे गोल्डन डक आहे. सूर्याच्या तेजावरचे ग्रहण किती दिवसांनी निघून जाणार हे सांगणे कठीण आहे.

मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमधील सूर्यकुमार यादवचे शेवटचे सहा डाव –

०(१)
१(२)
१५(१६)
०(१)
०(१)
०(१)

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना १९.४ सर्वबाद १७३ केल्या होत्या. अक्षर पटेल आणि डेव्हिड वॉर्नर यांनी संघासाठी चमकदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने ४ गडी गमावून १७३ धावा करत विजय नोंदवला.अक्षरने आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मुंबईकडून पियुष चावला आणि बेहरेनडॉर्फने ३-३ बळी घेतले. हृतिक शोकीनला १ बळी मिळाला.

हेही वाचा – DC vs MI: ‘भारतात फक्त दोन पीसी आहेत, एक प्रियांका चोप्रा, दुसरा…’; रवी शास्त्रींनी मुंबईच्या ‘या’ खेळाडूचं केलं कौतुक

१७३ धावांचा पाठलाग करताना ७१ धावांवर मुंबई इंडियन्सची पहिली विकेट पडली. इशान किशन २६ चेंडूत ३१ धावा करून धावबाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार मारले. त्यानंतर १३९ धावांवर मुंबई इंडियन्सची दुसरी विकेट पडली. तिलक वर्मा २९ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. मुकेश कुमारने त्याला मनीष पांडेकरवी झेलबाद केले. त्याने आपल्या खेळीत एक चौकार आणि चार षटकार मारले.

Story img Loader